Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडात कोण कोण शिवसेना आमदार? हे 13 आमदारही नॉट रिचेबल

Eknath Shinde : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे 13 आमदारांना घेऊन सुरतला गेल्याचं सांगितलं जातं. शिंदे हे 13 आमदारांसह कारने सुरतला गेले.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडात कोण कोण शिवसेना आमदार? हे 13 आमदारही नॉट रिचेबल
एकनाथ शिंदेमुळे ठाकरे सरकारचं अस्तित्व धोक्यात? शिंदे बंडावर ठाम राहिले तर सरकार कोसळणार? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 10:05 AM

मुंबई: विधान परिषदेची निवडणूक (vidhan parishad election) पार पडताच राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासोबत एकूण 13 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारविरोधात बंड केल्याचं सांगितलं जात आहे. 13 आमदारांना घेऊन शिंदे यांनी सुरत गाठल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे ज्या ला मेरेडियन हॉटेलात थांबले आहेत, त्या हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिंदे यांच्यासोबत कोकण, ठाणे आणि औरंगाबादमधील सहा आमदार नॉट रिचेबल आहेत. दोन विद्यमान मंत्र्यांसोबत शिंदे हे सुरतला आले असून आज दुपारी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आज ठाकरे सरकार संकटात सापडल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे 13 आमदारांना घेऊन सुरतला गेल्याचं सांगितलं जातं. शिंदे हे 13 आमदारांसह कारने सुरतला गेले. सुरत विमानतळाजवळच्या ला मेरेडियन हॉटेलमध्ये शिंदे या आमदारांना घेऊन उतरल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांनी हॉटेल गाठल्यानंतर या हॉटेलात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या हॉटेलबाहेर पहिल्यांदाच एवढा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस शिंदे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

नॉट रिचेबल आमदार

शहाजी बापू पाटील महेश शिंदे सातारा भरत गोगावले महेंद्र दळवी महेश थोरवे विश्वनाथ भोईर शांताराम मोरे संजय राठोड संदीपान भुमरे उदयसिंह राजपूत संजय शिरसाठ रमेश बोरणारे प्रदीप जैस्वाल अब्दुल सत्तार

शरद पवारांची बैठक

दरम्यान, ठाकरे सरकारवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत ठाकरे सरकार अडचणीत आल्यास काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होणार आहे. स्वत: शरद पवार या बैठकीत भाग घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

खासदारांना मुंबईत बोलावलं

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्व खासदारांना मुंबईत बोलावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. त्यात पुढची रणनीती ठरवली जाणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.