‘सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी आधीच सांगितलेलं’, संजय राऊतांचं मोठं विधान

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निलंबित पोलीस साहायक सचिन वाझे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे (Sanjay Raut on Sachin Vaze).

'सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी आधीच सांगितलेलं', संजय राऊतांचं मोठं विधान
शिवसेना नेते संजय राऊत
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 8:28 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. “सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा जेव्हा निर्णय घेण्यात येत होता तेव्हाच मी शिवसेनेच्या काही नेत्यांना सांगितलं होतं. वाझेंच्या कामाच्या पद्धतीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं, असा इशारा मी तेव्हाच दिला होता”, असा खुलासा संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अशाप्रकारचा दावा केला (Sanjay Raut on Sachin Vaze).

‘नेत्यांचं नाव सांगणार नाही’

“मी पक्षाच्या काही नेत्यांना इशारा दिला होता. मी त्या नेत्यांच्या नावाचा खुलासा करु शकत नाही. पण आमच्यात जे संभाषण झालं त्याची सर्वांना जाणीव आहे”, असंदेखील संजय राऊत यांनी सांगितलं (Sanjay Raut on Sachin Vaze).

‘सरकारला धडा मिळाला’

“सचिन वाजे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलंच झालं, ज्यामुळे धडा शिकायला मिळाला”, असं ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर कोणताही व्यक्ती वाईट नसतो. पण कधीकधी परिस्थिती त्यांना तशी बनवते, असंही ते यावेळी म्हणाले.

‘तेव्हाच सांगितलेलं, अडचणीत याल’

“जेव्हा सचिन वाझेला महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा समाविष्ट करण्याची योजना आखली जात होती तेव्हाच मी काही नेत्यांना सूचित केलं होतं, वाझे आपल्यासाठी अडचणी निर्माण करु शकतात. त्यांचा व्यवहार आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे सरकार अडचणीत येऊ शकतं”, असंही त्यांनी सांगितलं.

‘मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेंचे कामं माहिती नव्हते’

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सचिन वाझे यांचं समर्थन केलं होतं. सचिन वाझे दहशतवादी नाही, अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याबाबत राऊत यांना विचारलं असता, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तेव्हा वाझेच्या कामांबाबत माहिती नव्हती”, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिली.

सचिन वाझे कोण आहेत?

सचिन वाझे हे मुंबई क्राईम ब्रांचचे प्रमुख होते. महाविकास आघाडी सरकार येण्याआधी ते निलंबित होते. पण कोरोना काळात त्यांना सरकारने पुन्हा सेवेत घेतले होते. त्यांना मुंबई क्राईम ब्रांचचं प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, सचिन वाझे हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणी दोषी असल्याचं समोर येत आहे. ते खरोखर दोषी आहेत का हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. ते सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. एनआयएकडून सचिन वाझे यांची कसून चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे सचिन वाझे यांचे मनसूख हिरेन यांच्यासोबत असलेले संबंध, याशिवाय सचिन वाझे यांनी नष्ट केलेले पुराव्यांपासून अनेक गोष्टींचा छळा एनआयएने लावला आहे. या केसमध्ये रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. याशिवाय या प्रकरणावरुन विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका होत आहे.

संबंधित बातमी :

पवार-शहा भेट झालीच नाही, अफवांची धुळवड थांबवा; संजय राऊतांचं ट्विट

संबंधित व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.