श्रीकांत शिंदे यांनी दाखवला सुसंस्कृतपणा, राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर असं दिलं उत्तर
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांचं नाव घेताच थुंकत प्रतिक्रिया दिली. राऊत्यांच्या या कृतीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षानंतर ही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. संजय राऊत दररोज एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर टीका करत आहेत. तर शिंदे गटाचे नेते ही त्यांना प्रत्यूत्तर देत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असं चित्र याआधी कधीही पाहायला मिळालं नव्हतं. संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे ( MP Shrikant Shinde ) यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
संजय राऊत आज पत्रकार परिषदेत बोलत असताना पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर थुंकले. यावर उत्तर देताना श्रीकांत शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘मला वाटतं जसं सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. वेगळी संस्कृती आहे. जिथे विरोधक देखील एकमेकांचे नाव आदराने घेत असतात. आज त्या सगळ्या पातळ्या सोडून दिल्या जात आहेत. विरोधक सकाळपासूनच शिव्या शाप देण्याचे काम सुरू करतात ते रात्रीपर्यंत सुरू असतं. महाराष्ट्राची संस्कृती दूषित करण्याचे काम सुरु आहे.’
पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण – श्रीकांत शिंदे
‘मला वाटतं बाकीचे राज्य आपल्याकडे कसे बघतात युवक आपल्याकडे कसे बघतात एक राजकारणी म्हणून या सगळ्यांचा विचार करणं आपण गरजेचे आहे. सत्ता येथे सत्ता जाते या अगोदर देखील सत्ता आल्या सत्ता उलटवल्या गेल्या परत सत्ता लोक सत्तेत आले पण गेल्या दहा महिन्यापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने सरकार उलथवून लावले आहे तेव्हापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण केलं जातं आहे.’
‘कितीही शिव्या शाप द्या माझं उत्तर कामातून असेल’
‘मला लोकांना सांगायचं आहे. विचारायचा आहे. आपण व्यक्त झालं पाहिजे हे सगळं जे कशाप्रकारे या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. कामाचे उत्तर कामाने दिले पाहिजे. शिव्या शाप किंवा थुंकून या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. शिंदे साहेब नेहमी म्हणतात की, मला तुम्ही कितीही शिव्या शाप द्या किती पण टीका करा पण माझं उत्तर हे कामातून असेल. आम्ही पातळी कधी सोडली नाही आणि सोडणार देखील नाही.