Marathi News Politics Shivsena Sanjay Raut Home ED inquiry In mumbai Bhandup Maitri Bungalow Photos
Sanjay Raut ED Inquiry : संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक, चौकशी सुरु, पाहा फोटो…
संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक
Follow us
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे.
ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचलं
ईडीचे 10 ते 12 अधिकारी संजय राऊत यांच्या घरी आहेत. तसेच सात ते आठ सीआरपीएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असं त्यांनी नुकतंच ट्विट केलं आहे.
राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झाल्याने त्यांचे समर्थक घोषणाबाजी करत आहे. संजय राऊत आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, असं हे शिवसैनिक म्हणताना दिसत आहेत.