राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण, राऊतांचा हल्लाबोल

"राजीव गांधी मोठे नेते होते... नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचे धोरण आहे, अशा शब्दात सरकारने घेतलेल्या निर्णयावर संजय राऊत यांनी टीका केली. तर ध्यानचंद हे मोठे खेळाडू आहेत त्याबद्दल वाद नाही, पण नावांचं राजकारण कशासाठी?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण, राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 10:03 AM

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं (Khelratna Award) नाव बदलण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) यांनी काल ट्विटरद्वारे केली. राजीव गांधींचं (Rajiv Gandhi) नाव हटवून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद असं असेल, अशी घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तसंच सोशल मीडियारुनही काहीशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे मोदींनी घेतलेल्या निर्णायाचं काही जण कौतुक करतायत तर राजीव गांधींचं नाव हटवल्याने काही जण मोदींवर द्वेषभावनेची टीका करतायत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही काहीशी संमिश्र प्रतिक्रिया देताना राजीव गांधींचं मोठेपण सांगत सरकारच्या कोतेपणावर प्रहार केला.

काय म्हणाले संजय राऊत?

“राजीव गांधी मोठे नेते होते… नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचे धोरण आहे, अशा शब्दात सरकारने घेतलेल्या निर्णयावर संजय राऊत यांनी टीका केली. तर ध्यानचंद हे मोठे खेळाडू आहेत त्याबद्दल वाद नाही, पण नावांचं राजकारण कशासाठी?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“सरकारच्या निर्णयावर आम्हाला काही म्हणायच नाही… याआधीही असे अनेक निर्णय घेतले आहेत… नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण आहे… ध्यानचंद हे मोठे खेळाडू आहेत… एखादं नाव पुसून दुसरं नाव दिले जातं… त्यामुळे वेगळं वाटतं”, अशी प्रतिक्रिया देताना त्यांनी केंद्रावर ताशेरे ओढले.

राजीव गांधींचं नाव हटवलं, खेलरत्न पुरस्कार आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’!

1928, 1932 आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांचा सन्मान भारत सरकारने केलाय. खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने ओळखलं जाईल, अशी माहिती काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिली.

‘मोदींच्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन’, काँग्रेसकडून टीकेची झोड

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. ‘राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार 2002 पासून आधी आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे’, अशी टीका सचिन सावंत यांनी केलीय.

(Shivsena Sanjay Raut Slam Modi GOVT Over name Changing Khelratna Award)

हे ही वाचा :

मोदींनी राजीव गांधींचं नाव हटवलं, काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया, नेमकं काय घडतंय?

Special Report : ज्यांच्यासाठी राजीव गांधींचे नाव हटवले, ते मेजर ध्यानचंद कोण होते?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.