बालपणी बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला, आता पवारांचे आशीर्वाद; आमदार लंकेंची चर्चा तर होणारच!
पारनेरचे लोकप्रिय आमदार म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे. (shivsena to ncp, know nilesh lanke's political journey)
मुंबई: पारनेरचे लोकप्रिय आमदार म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांना जपणारा आणि मतदारसंघातील लोकांची काळजी घेण्यासाठी वाट्टेल ते करणारा आमदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. शिवसेनेतून कार्यकर्ता म्हणून जडणघडण झालेले निलेश लंके आज राष्ट्रवादीत आहेत. त्यांची राजकीय वाटचाल कशी सुरू झाली? याविषयीचा घेतलेला हा आढावा. (shivsena to ncp, know nilesh lanke’s political journey)
वडील शिक्षक, राजकारणाचा संबंध नाही
आमदार निलेश लंके यांचा जन्म पारनेर तालुक्यातील हंगा येथे झाला. त्यांचे वडील ज्ञानदेव लंके हे प्राथमिक शिक्षक होते. कोणताही राजकीय वारसा नसतानाही लंके यांनी पारनेर विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.
बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवला
लंके पाचवी-सहावीत असतानाची गोष्ट आहे. तेव्हा हंगा बसस्थानकावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे थांबले होते. तेव्हा गर्दीतून वाट काढत निलेश लंके बाळासाहेबांपर्यंत पोहोचले. बाळासाहेबांना जवळून पाहण्याची इच्छा होती. त्यामुळे ते बाळासाहेबांजवळ गेले. बाळासाहेबांनीही या लहानग्या निलेशच्या डोक्यावर हात ठेवला अन् तेव्हापासून लंके यांना समाजकारणाचं वेड लागलं ते आजतागायत कायम आहे.
चहाचे दुकान थाटले
लंकेंना बालपणी कुस्तीत प्रचंड रस होतात. लाल तांबड्या मातीत ते मनसोक्त कुस्ती खेळायचे. परंतु काही काळानंतर त्यांचा हा नाद सुटला. पोटापाण्यासाठी त्यांनी हंगा स्टँडवर चहाचे हॉटेल काढले होते. पण सामाजिक कार्यकर्त्यांकडून ते चहाचे पैसे घेत नसायचे. त्यामुळे त्यांना लवकरच दुकान बंद करावे लागले. याच दरम्यान त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. हंगा ग्रामपंचायतीसाठी त्यांनी अर्जही दाखल केला. परंतु वय कमी असल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. नंतर पाच वर्षांनी त्यांनी हंगा ग्रामपंचायत लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर सुपा गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवली. इथूनच त्यांच्या राजकीय जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
यशाची वाटचाल अन्
पुढे त्यांना पारनेर तालुका शिवसेना प्रमुखपदाची जबाबदारी मिळाली. त्यामुळे त्यांनी गावागावात शिवसेनेच्या शाखा निर्माण केल्या. त्याचा परिणाम म्हणून त्यांची पत्नी सुपा गणातून निवडून आल्या आणि पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या. याच दरम्यान त्यांनी एमआयडीसीत तरुणांना नोकरी मिळवून देण्याचा संघर्ष केला. वृद्धांना पेन्शन योजना सुरू केली. अनेक शेतकऱ्यांना कृषी साहित्य मिळवून दिले आणि विहिरीचे अनुदानही मिळवून दिले. त्यामुळे त्यांचा तालुक्यात दरारा वाढला. मात्र, ही यशाची वाटचाल सुरु असतानाच त्यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीत प्रवेश
जानेवारी 2019मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेत शिवसेना आमदार विजय औटी यांच्याशी न पटल्याने त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्य़ातील निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यांच्या समर्थकांनी उद्वव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं सांगण्यात येत होतं.
पवारांच्या नावे दोन कोविड सेंटर
निलेश लंके यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. अहमदनगरला लंके यांनी दुसऱ्यांदा शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलंय. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 खाटांच हे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. यामध्ये शंभर ऑक्सिजन बेड आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. एप्रिलमध्ये या सेंटरसाठी 17 लाख रोख रक्कम आणि पाच टन धान्य जमा झाले होत. तर, भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तूंचं वाटप रुग्णांना करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने यापूर्वी पारनेरमधील टाकळी ढाकेश्वर इथं 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केले होते. त्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आलेली. त्या सेंटरमध्ये खास रुग्णांसाठी प्रोजेक्टर, मोबाईल गेम आणि कॅरम बोर्ड अशा अनेक गोष्टींची व्यवस्था करण्यात आली होती.
आमदार असावा तर असा
निवडणुकीपुरतं कार्यकर्त्यांना वापरुन घेऊन, त्यानंतर त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणारे राजकारणी पावलोपावली दिसतात. मात्र लंके त्याला अपवाद ठरले आहेत. निलेश लंके यांनी मध्यंतरी स्वत: आपला बेड कार्यकर्त्यांना झोपण्यासाठी दिला आणि स्वत: सतरंजीवर झोपले. त्याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबईतील आमदार निवासात, कार्यकर्ते गादीवर आणि आमदार निलेश लंके सतरंजीवर झोपल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील आमदार निवासात त्या त्या मतदारसंघातील लोकांना आमदारांच्या पत्राने तात्पुरती निवाऱ्याची सोय होते. बाहेरगावावरुन आलेले नागरिक आपली मुंबईतील कामं आटोपून गावी परततात. अशाच कामांसाठी आमदार लंके यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते मुंबईतील आले होते. लंके हे आमदार निवासात आले त्यावेळी कार्यकर्ते आधीच त्यांच्या बेडवर झोपेले होते. ते पाहून लंके यांनी बाजूची सतरंजी जमिनीवर टाकली आणि खालीच झोपणे पसंत केलं. मध्यंतरी नगरमध्ये त्यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्येही जमिनीवर गादी टाकून ते झोपले होते. त्याचे फोटोही तुफान व्हायरल झाले होते.
पवारांचा थेट फोन, काळजी घे
कोरोना काळातील लंके यांचं काम पाहून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना फोन करून त्यांचं कौतुक केलं होतं. निलेश तू कोरोना रुग्णांवर मोफत उपचार व्हावे म्हणून कोविड सेंटर सुरू केलं. ही कौतुकास्पद बाब आहे. रुग्णांना औषधांपासून ते जेवण्याच्या व्यवस्थेपर्यंत तू लक्ष घालतोस ही चांगली गोष्ट आहे. हे काम अतिशय चांगले आहे. पण रुग्णांची काळजी घेत असताना तू स्वत:ची काळीजी घे. काही लागल्यास मला कळव, असं पवार लंकेंना फोनवर बोलले होते. (shivsena to ncp, know nilesh lanke’s political journey)
कोण आहेत आमदार निलेश लंके?
>> निलेश लंके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत >> ते नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात >> निलेश लंके हे आधी शिवसेनेत होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला >> 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लंक यांनी शिवसेना आमदार विजय औटी यांचा पराभव केला (shivsena to ncp, know nilesh lanke’s political journey)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 12 May 2021 https://t.co/51w1GPu1XN #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2021
संबंधित बातम्या:
राजीव गांधींचा मध्यरात्री फोन आला अन् राजकारणात आलो; पृथ्वीबाबांचा हा किस्सा माहीत हवाच!
उदयनराजेंशी अबोला, गोरेंशी पंगा; निंबाळकर राजघराण्याचे 29 वे वंशज रामराजेंचे हे वाद माहीत आहे का?
अमोल मिटकरींच्या भाषणांची अजितदादांना भुरळ; थेट विधान परिषदेवर संधी; कसा मिळाला टर्निंग पॉइंट? वाचा
(shivsena to ncp, know nilesh lanke’s political journey)