उद्धव ठाकरे आणि नारायण राणे व्यासपीठावर एकत्र, रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी, म्हणाले…
रामदास आठवले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात ही कविता म्हटली. 'याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवलेय महायुतीचे गाणे'. चिपी विमानतळाच्या उद्घटनासाठी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकत्र आले आहेत. | Sindhudurg Chipi Airport Maharashtr
सिंधुदुर्ग: कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात शनिवारी अपेक्षेप्रमाणे राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलेली एक चारोळी चर्चेचा विषय ठरली. या चारोळीच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपची पुन्हा युती व्हावी, अशी इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.
रामदास आठवले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात ही कविता म्हटली. ‘याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवलेय महायुतीचे गाणे’. चिपी विमानतळाच्या उद्घटनासाठी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकत्र आले आहेत. नारायण राणे यांनी मला अगोदरच सांगितले आहे की, माझे मुख्यमंत्र्यांशी कोणतेही वैर नाही. उद्धव ठाकरे यांनीही नारायण राणे यांच्यासोबत एकत्र काम केले आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेव्हा मीदेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना रामदास आठवले यांनी उजाळा दिला. चिपी विमानतळासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.
ना एकमेकांकडे पाहिलं, ना नमस्कार केला, ठाकरे-राणेंमधील टशन चिपी विमानतळावरही दिसली!
दुपारी साडेबाराच्या आसपास राणे आणि मुख्यमंत्र्यांचं विमान चिपीवर लँड झालं. पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक नेते आणि मंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी मुख्यमंत्री आणि राणेंचं स्वागत केलं. पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे कोनशिलेच्या दिशेने रवाना झाले. नंतर काही वेळातच राणे कोनशिलेजवळ आले. तिथे उद्धव ठाकरे-राणे एकमेकांना नमस्कार करुन कमीत कमी स्मितहास्य करतील, अशी शक्यता होती. परंतु ना उद्धव ठाकरेंनी नमस्कार केला ना राणेंनी…!
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे जवळपास 16 वर्षांनी एकाच मंचावर येत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्यातलं राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं. पण आज कोकणच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी असलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी राणे-ठाकरे आपल्यातल्या वाद बाजूला ठेऊन एकमेकांना बोलतील, चर्चा करतील. कमीत कमी एकमेकांना पाहून नमस्कार तरी करतील, अशी शक्यता होती. पण तसं काहीच झालं नाही. हे ही वाचा :