समाजसेवक अण्णा हजारे संतापले … शिष्य अरविंद केजरीवाल यांना पत्रातून या मुद्द्यावर खडसावलं…
या पत्राविषयी माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्ङणाले, ' केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दारूबंदीची जी पॉलिसी केली, ती अत्यंत चुकीची आहे. प्रत्येक वॉर्डात दारुचं दुकान उघडायचं आणि दारू पिाणाऱ्यांना 25 वर्ष वय होतं ते 21 वर्ष आणलं.
अहमदनगर । नेहमी शांततेच्या मार्गाने प्रतिक्रिया देणार समाजसेवक अण्णा हजारे आज संतापल्याचं दिसून आलंय. तेसुद्धा त्यांचे एकेकाळचे शिष्य अरविंद केजरीवाल (Arvind kejariwal) यांच्यावर. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दारुविषयक नव्या धोरणावरून अण्णा हजारेंनी (Anna Hajare) आगपाखड केली आहे. गांधीजींच्या विचारांवरून प्रेरणा घेत तुम्ही समाजकारण आणि राजकारण सुरु केलं होतं. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र मुख्यमंत्री (Delhi CM) झाल्यानंतर तुम्ही हे विसरलात. तुम्हाला सत्तेची नशा चढली आहे, अशा शब्दात अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांना सुनावलं आहे. अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलंय..
पत्रातला मजकूर काय?
पत्रात अण्णा हजारेंनी लिहिलंय, दिल्ली सरकारच्या दारुविषयक धोरणांच्या बातम्या वाचून खूप दुःख होतंय. मी ४७ वर्षांपासून भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करतोय. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधात मी लढा दिला. गावातील अनेक दारुभट्ट्या बंद केल्या. लोकपाल आंदोलनात आपण एकत्र काम केले. तेव्हा तुम्ही मनीष सिसोदियांसोबत अनेकदा राळेगणसिद्धीत आला आहात. येथील दारुबंदी पाहिल्यानंतर तुम्ही प्रभावित झाला होतात. पण दिल्ली सरकारने नवेच धोरण आणले आहे. यामुळे दारु विक्री आणि दारु पिण्याला प्रोत्साहन मिळू शकते. यामुळे भ्रष्टाचारही वाढू शकतो. एका आंदोलनातून जन्मलेल्या राजकीय पार्टीला हे शोभत नाही….
समाजसेवक अण्णा हजारे संतापले …दारुविषयक धोरणावरून शिष्य अरविंद केजरीवाल यांना पत्रातून खडसावलं… pic.twitter.com/j199AWWQ2C
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2022
अण्णा हजारेंची प्रतिक्रिया काय?
या पत्राविषयी माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्ङणाले, ‘ केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दारूबंदीची जी पॉलिसी केली, ती अत्यंत चुकीची आहे. प्रत्येक वॉर्डात दारुचं दुकान उघडायचं आणि दारू पिाणाऱ्यांना 25 वर्ष वय होतं ते 21 वर्ष आणलं. दारूने बर्बाद होते. मला दुःख झालं. पहिल्यांदा मी अरविंदच्या विरोधात अशा प्रकारची नोट काढली. माझी अपेक्षा आहे, मी बोलत होतो, तुम्ही मला गुरू गुरू म्हणत होते. कुठे गेले ते विचार? असा सवाल अण्णा हजारे यांनी केलाय.