सोलापूरचं पाणी आधी बारामती, आता इंदापूरला पळवलं, राष्ट्रवादी पाणी चोर, भाजपचा हल्ला; वाचा काय आहे वाद
सोलापूरचं हक्काचं पाणी आधी बारामती आणि आता इंदापूरला पळविण्यात आल्याने भाजपचे आमदार राम सातपुते प्रचंड संतापले आहेत. (solapur people opposed to taking ujani dam water from solapur to indapur)
सोलापूर: सोलापूरचं हक्काचं पाणी आधी बारामती आणि आता इंदापूरला पळविण्यात आल्याने भाजपचे आमदार राम सातपुते प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पाणी चोर आहे. पाण्यासाठी त्यांच्या विरोधात संघर्ष करू, असा इशारा राम सातपुते यांनी दिला आहे. (solapur people opposed to taking ujani dam water from solapur to indapur)
सातपुतेंच ट्विट काय?
राम सातपुते यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. सोलापूर जिल्ह्याचं हक्काचं पाणी आधी बारामतीला आता इंदापूरला पळवलं आहे.सत्तेच्या जोरावर घेतलेले अत्याचारी निर्णय फार काळ टिकत नसतात. राष्ट्रवादी काँग्रेस पाणी चोर हेच समीकरण आहे. आता संघर्ष करू, पण सोलापूरच हक्काचं पाणी चोरू देणार नाही, असा इशारा सातपुते यांनी दिला आहे.
काय आहे वाद?
सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला आहे. या कृताचा निषेध म्हणून सोलापुरात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पाणी बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीने येत्या 1 मे रोजी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी पळवल्याने जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रही निम्मे कमी होऊ शकते. या विरुध्द जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार व आमदारांनी या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे.
उजनीचं पाणी इंदापूरला देण्यास काँग्रेसचा विरोध
उजनी धरणाचं पाणी इंदापूरला देण्यास सोलापूर काँग्रेसनेही विरोध केला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या नादी लागू नये. ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला हा सोलापूर जिल्हा आहे. आम्ही अन्याय खपवून घेत नाही, याची भरणे यांनी जाण ठेवावी, असा इशारा सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिला आहे. उजनीतील पाणी इंदापूरला देण्यास आमचा सक्त विरोध आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून पालकमंत्र्याच्या या निर्णयाचा निषेध नोंदवेल, असा इशाराही वाले यांनी दिला आहे.
… तर राजकीय संन्यास घेईल
सोलापूरसाठीच्या नियोजित पाण्यामधील उजनी धरणाचं 5 टीएमसी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाल्यास मंत्रीपद नव्हेतर आमदारकीचा राजीनामा देऊन संन्यास घेणार असल्याचं दत्तात्रय भरणे म्हणाले होते. जिल्ह्यातील नियोजित पाण्याचा एक थेंबही इंदापूरसाठी घेतलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. उजनीचं पाणी जर इंदापूरसाठी घेतलं असलं तर राजकीय सन्यास घेईन. उजनी धरणाचं 5 टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप केला जातोय, मात्र, माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
सोलापूरकर काय म्हणतात?
सोलापूरचं पाणी इंदापूरला पळविण्यात येत असल्याने त्यावर सोलापूरच्या जनतेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोलापूरकरांनी ट्विटरवरूनही आपला संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची माती करणारी राष्ट्रवादी तांदूळ चोर आणि पाणी चोर आहे, असं अजय साळुंखे यांनी म्हटलं आहे. तर आदित्य मुस्के यांनी राष्ट्रवादी आणि चोर हा शब्द समानार्थी असल्याचं म्हटलं आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पाणी पळविल्याचा पुरावा असेल तर द्या. ते राजीनामा देतील. उगाच ढगात गोळी मारून खोटं पसरवू नका, असं अभिजीत सनस यांनी म्हटलं आहे.
सोलापूर जिल्ह्याचं हक्काचं पाणी आधी बारामतीला आता इंदापूर ला पळवलं.सत्तेच्या जोरावर घेतलेले अत्याचारी निर्णय फार काळ टिकत नसतात.राष्ट्रवादी कांग्रेस पाणी चोर हेच समीकरण आहे.आता संघर्ष करू पण सोलापूरच हक्काचं पाणी चोरू देणार नाही.@AjitPawarSpeaks @bharanemamaNCP @Dev_Fadnavis
— Ram Satpute (@RamVSatpute) April 29, 2021
फडणवीसांच्या काळात काय ठरलं?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील पाच महानगरपालिकांमध्ये दोन वर्षांत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यात सोलापूर पालिकेचाही समावेश होता. या प्रकल्पातून शुद्ध झालेल्या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी वापर करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात सांडपाण्यावर प्रक्रिया होत नव्हती. या पालिका क्षेत्रातील उद्योगाचे पाणी उजनी धरण्यात सोडण्यात येत होतं. त्यामुळे उजनीचं पाणी दूषित होत असल्याने हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बारामतीसाठी निर्णय
सोलापूरच्या उजनी धरणात नीरा-देवघरच्या पाण्याचा सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. पंरतू अजित पवारांनी सत्तेवर येताच नदीच पात्र फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. नीरा- देवघरचं पाणी फलटण व सोलापूरच्या जनतेला देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाला होत; राज्यात सत्ता बदलताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निर्णय फिरवला. बारामती जवळच्या उद्धट- तावशी इथल्या नीरा नदीला अडवून 8 टीएमसी पाणी उजनीकडे वळवायचा प्रकल्प युद्ध पातळीवर सुरु आहे. यामुळं नीरा नदीचं 54 किलोमीटरच अस्तित्व संपेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. (solapur people opposed to taking ujani dam water from solapur to indapur)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 29 April 2021 https://t.co/9r9Gxkx25A #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2021
संबंधित बातम्या:
LIVE | डोंबिवली मोठा गाव ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद होणार, शिवसेना नगरसेवकाची माहिती
AUDIO | 20 मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, शिवसेना आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल
(solapur people opposed to taking ujani dam water from solapur to indapur)