VIDEO : बीड जिल्ह्याचं नाव केलंss, लोकनेत्याच्या लेकीनंss, किशाबाईंच्या आवाजात पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं
भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर गएक गाणं लिहिण्यात आलं आहे. किशाबाई सौंदरमल (Kishabai Saundarmal) यांनी हे गाणं गायलं आहे.
मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर गएक गाणं लिहिण्यात आलं आहे. किशाबाई सौंदरमल (Kishabai Saundarmal) यांनी हे गाणं गायलं आहे. किशाबाई आणि त्यांचा मुलगा प्रथम सौंदरमल (Pratham Saundarmal) यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. पंकजा मुंडेंसमोर किशाबाईंनी गाणं गायिलं. हे गाणं ऐकून पंकजा मुंडे भारावून गेल्या.
पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. पंकजा मुंडे म्हणाल्या, “किशाबाई सौंदरमल यांची आणि माझी पहिली भेट आज झाली… मुलगा प्रथम सौंदरमल हा उत्तम लिहितो आणि मुलगी सुंदर गाते… त्यांच्या कष्टाच्या जीवनातील दोन क्षण दिलासा..”
काय आहेत गाण्याचे बोल?
नका वागू रे बेकीनं, राहा विचार एकीनं,
बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं,
बीड जिल्ह्याचं नाव केलंsss मुंडे साहेबांच्या लेकीनं
मंत्रिपदावर असताना नाही कशाचीच हाव,
काय सांगतात जनतेला तुमचं हावं प्रेम व्हावं
मनोभावे सेवा करीन, तुमची रात्रं आणि दिन
बीड जिल्ह्याचं नाव केलं, लोकनेत्याच्या लेकीनं
VIDEO : पंकजा मुंडे यांचं गाणे
किशाबाई सौंदरमल आणि माझी पहिली भेट आज झाली…मुलगा उत्तम लिहितो आणि मुलगी सुंदर गाते… pic.twitter.com/c4pGh7aYeC
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 4, 2021
संबंधित बातम्या