Sanjay Raut ED Raid : इंग्रजांचं धोरणच भाजप राबवतेय, अजून किती लोकांना तुरुंगात टाकणार?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

राज्यपालांनी कार्यालयात भाजप कार्यालय उघडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. भाजपचे कटकारस्थान जनतेला कळायला लागलं आहे. धनुष्यबाण गोठविण्याच काम आता ते करणार आहेत.

Sanjay Raut ED Raid : इंग्रजांचं धोरणच भाजप राबवतेय, अजून किती लोकांना तुरुंगात टाकणार?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 1:01 PM

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही मोठे विधान करत भाजपाला टार्गेट केले आहे. पटोले बोलताना म्हणाले की, आमच्या विरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू अस इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अमंलबजावणी भाजप सरकार करतय…संजय राऊत यांच्यावर कारवाई नवीन नाही. राऊतांवर दबाव आणि त्यांना ब्लॅकमेल (Blackmail) करण्यासाठी हि कारवाई केली जात असल्याचा धक्कादायक आरोप नाना पटोलेंनी केलायं. पटोले यांनी हे वक्तव्य संगमनेर येथे केले आहे.

पटोले यांनी केला भाजपावर गंभीर आरोप

बोलताना पटोले म्हणाले की, अजून किती लोकांना जेलमध्ये टाकायचं हे भाजपने ठरवावे. परंतु भारतातील लोकशाहीला ते सोप्या पद्धतीन हलवू शकणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. आपले पाप लपविण्यासाठी अशी कारवाई करणे हे नवीन नाही. अग्निपथ योजनेतील तरुणांचा उद्रेक वाढल्यानंतर लगेच ईडी कार्यालयात बोलावून वातावरण बदललं गेलय. मुळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट आहे. राज्यपालांनी जो खंजीर महाराष्ट्राच्या पाठीत खुपसला, जो घाव केला त्याला जनता कधी विसरणार नाही.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांनी कार्यालयात भाजप कार्यालय उघडले

राज्यपालांनी कार्यालयात भाजप कार्यालय उघडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. भाजपचे कटकारस्थान जनतेला कळायला लागलं आहे. धनुष्यबाण गोठविण्याच काम आता ते करणार आहेत. एका पार्टीला संपवून आम्ही कसे जिवंत राहू अशा पद्धतीच घाणेरडे राजकारण 75 वर्षात कोणी केले नाही. हे खालच्या पातळीच आणि लोकशाहीला घातक राजकारण केंद्रातल भाजप सरकार करत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटंले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.