Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, तिकडे आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी’, अतुल भातखळकरांची खोचक टीका

स्कॉटलंड देशातील ग्लास्गो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेस (सिओपी-26) कोणतेही अधिकृत निमंत्रण नाही. तरीही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पर्यटन करण्याचे काम चालविले आहे. त्यामुळे “इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

'इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, तिकडे आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी', अतुल भातखळकरांची खोचक टीका
आदित्य ठाकरे, अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 7:10 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरुन पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. स्कॉटलंड देशातील ग्लास्गो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेस (सिओपी-26) कोणतेही अधिकृत निमंत्रण नाही. तरीही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पर्यटन करण्याचे काम चालविले आहे. त्यामुळे “इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. (Atul Bhatkhalkar criticizes Aditya Thackeray’s visit to Scotland)

‘पर्यटन दौऱ्याचा खर्च आदित्य ठाकरेंकडून घ्या’

​या परिषदेला केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी आहे. असं असूनही आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते? त्याचे त्यांना निमंत्रण होते का? राज्यात मागील तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार यांना सहकुटुंब सोबत घेऊन जाण्याचे कारण काय? पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांचा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला? एवढा लवाजमा सोबत नेत आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले? अशी प्रश्नांची सरबत्तीच भातखळकर यांनी केलीय. तसंच या संपूर्ण पर्यटन दौऱ्याचा खर्च हा आदित्य ठाकरे यांच्याकडूनच वसूल करावा, अशी मागणही भातखळकर यांनी ठाकरे सरकारकडे केलीय.

मुंबईसह राज्यातील आठ शहरांना वायू प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे. अतिविषारी प्रदूषणामुळे दिवसागणिक शेकडो नागरिक आजारी पडत आहेत, असं असतानाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे केवळ पर्यटनात मग्न असल्याचा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.

सरकार भीती दाखवण्याचं काम करतेय – पडळकर

सरकार या संपावर मार्ग काढण्याऐवजी भीती दाखवण्याचं काम करत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीसा देत आहे. त्यांना निलंबनाच्या नोटीसा देत आहे. आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. पण तुम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काही बोलतच नसाल तर त्यातून मार्ग कसा निघेल. देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग कसा निघू शकतो याबाबत सरकारला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आम्ही केवळ भांडत नाहीत, तर प्रश्नावरील उत्तरही देत आहोत. त्यामुळे आता मार्ग काढायचा की नाही काढायचा हे सरकारच्या हातात आहे, असं पडळकर म्हणाले.

इतर बातम्या :

‘पवार म्हणाले मध्यममार्ग काढा, पण पवारांचा मध्यमार्ग पूर्वेला, दक्षिणेला की उत्तरेला?’ सदाभाऊ खोतांचा खोचक सवाल

शरद पवार यांनीच खरा एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला, पडळकरांचा हल्लाबोल; फडणवीसांसोबत सविस्तर चर्चा

Atul Bhatkhalkar criticizes Aditya Thackeray’s visit to Scotland

अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.