ST Workers Strike : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, आज तोडगा निघणार?

आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होण्यासारखी नसल्याचं सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय. अशावेळी कुठला मध्यममार्ग या बैठकीतून निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ST Workers Strike : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, आज तोडगा निघणार?
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 6:01 PM

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. तर मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी 14 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. अशावेळी आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होण्यासारखी नसल्याचं सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय. अशावेळी कुठला मध्यममार्ग या बैठकीतून निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Meeting at Sahyadri Guest House regarding strike of ST employees)

दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यात तब्बल साडे चार तास खलबतं झाली. त्यात पवारांनी एसटी महामंडळाची स्थिती समजून घेतली. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी काही महत्वाच्या सूचनाही पवारांनी दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पवारांच्या सूचना पडळकर, खोत यांच्यासह एसची कर्मचाऱ्यांना मान्य होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पवार, परबांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा?

शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बैठकीत एसटी महामंडळाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातमधील एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन आणि सुविधा आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि सुविधा देण्याबाबतीत समान स्तरावर असल्याचं समोर आलं. अशावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तातडीने तोडगा काढा, अशी सूचना पवार यांनी परबांना दिल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्यावी, असा सल्ला पवारांनी दिल्याचं कळतंय.

शरद पवारांच्या नेमक्या सूचना काय?

>> एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्या

>> पगारवाढ देताना अगदी कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी ते वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा

>> पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर जो आर्थिक ताण पडेल, त्यासाठी अर्थमंत्र्यांनी वर्षभराची तरतूद करावी

>> आर्थिक भार सोसावा लागेल तरी चालेल पण भरघोस पगारवाढ द्या

गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेतला नाही तर गुरुवारी मंत्रालयाला घेराव घालू. मंत्रालयातून एकाही मंत्र्याला बाहेर पडू देणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. गुरुवारी मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेची शक्यता आहे. त्यावेळी मंत्रालयाला घेराव घालण्याचा निर्णय आंदोलकांचा झाल्याचं पडळकर यांनी जाहीर केलं. तसंच मुंबईत विविध नोकऱ्यांसाठी ग्रामीण भागातून आलेला व्यक्ती या आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही पडळकर यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Video : खासदार प्रीतम मुंडे पत्रकारांवर भडकल्या! नेमकं कारण काय?

Breaking : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता, शरद पवारांच्या अनिल परबांना कोणत्या महत्वाच्या सूचना?

Meeting at Sahyadri Guest House regarding strike of ST employees

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.