‘आम्ही पंतप्रधानांना वाकवलं, तु्म्हाला वाकवण्यासाठी किती वेळ लागणार’ एसटी संपावरुन आडम मास्तरांचा परबांना इशारा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (Marxist Communist Party) नेते नरसय्या आडम (Narsayya Adam) मास्तर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांना सूचक इशाराही दिलाय. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाकडून आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राकेश टिकैत आणि योगेंद्र यादवही उपस्थित होते.

'आम्ही पंतप्रधानांना वाकवलं, तु्म्हाला वाकवण्यासाठी किती वेळ लागणार' एसटी संपावरुन आडम मास्तरांचा परबांना इशारा
नरसय्या आडम, अनिल परब, शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 4:06 PM

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरुच आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा करण्यात आली असली तरी एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, काही भागात मात्र एसटी बस (ST Bus) सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (Marxist Communist Party) नेते नरसय्या आडम (Narsayya Adam) मास्तर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांना सूचक इशाराही दिलाय. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाकडून आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राकेश टिकैत आणि योगेंद्र यादवही उपस्थित होते.

एसटीच्या संपावरुन कामगारांवर दडपशाही होत आहे, असा आरोप आडम मास्तर यांनी केलाय. इतकंच नाही तर ही दडपशाही सुरुच राहिल्यास महाराष्ट्र बंद करावा लागेल. अनिल परब साहेब, आम्ही मोदींना वाकवलं तुम्हाला वाकवायला किती वेळ लागणार, इशा शब्दात आडम मास्तर यांनी अनिल परब यांना इशारा दिला आहे. तत्पूर्वी आडम मास्तर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे. 9 नोव्हेंबर रोजी सोलापूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी संपाला सक्रीय पाठिंबा जाहीर केला होता.

7वा वेतन आयोग, 10 वर्षाच्या कराराबाबत विचार होऊ शकतो- परब

दरम्यान, पगारवाढीची घोषणा केल्यानंतर अनिल परब यांनी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. दोन दिवसांपूर्वी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना परब म्हणाले की, पगारवाढ दिल्यानंतर संपाबाबत जो संभ्रम आहे, समज गैरसमजाबाबतही चर्चा झाली. जी आश्वासनं मी देतोय, काही जाचक अटी असतील त्यावर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही. पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नसल्याचं त्यांना सांगितलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांच्या मदतीनं एसटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. विलिनीकरणाचा मुद्दा जो त्यांच्या डोक्यात आहे. सातवा वेतन आयोग द्या आणि करार 10 वर्षाचा करा अशीही मागणी आली. त्यावरही विचार केला जाऊ शकतो. पण आज महाराष्ट्र सरकार चार पावलं पुढे आलं आहे. भरघोस वेतनवाढ दिलीय. अशावेळी एका मुद्द्यासाठी जो मुद्दा सरकारच्या हातात नाही. त्यामुळे समितीच्या अहवालानंतरच विलिनीकरणावर निर्णय होईल. त्यामुळे एसटी सुरु करण्यासाठी, सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी, कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कामावर रुजू होण्याचं आवाहन मी केलं.

पैसे देऊनही संप चालू राहणार असेल तर…

सतत आर्थिक भार सोसत राहायचं आणि त्या बदल्यात एसटी बंद ठेवायची असंही होणार नाही. सरकारला विचार करावाच लागेल. पैसे देऊनही संप चालू राहणार असेल तर पैसे न दिलेले काय वाईट आहे. असा विचारही सरकार करु शकतं. कामगारांचं मागणं, त्यांचे हक्क अबाधित ठेवणं हे आमचं कामच आहे. त्यामुळे संप मिटला तर ज्या छोट्या मागण्या त्यांनी केल्या त्यावर नक्की विचार केला जाईल, असं आश्वासन देत असल्याचं परब यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

‘आमच्या कामावर अमित शाह समाधानी’, चंद्रकांत पाटलांकडून संघटनात्मक बदलांच्या चर्चेला पूर्णविराम

हल्ली पुढारी नमस्कार सुद्धा करत नाहीत, यांच्या बापाचे काय जाते कळत नाही; अजितदादांचे जोरदार आसूड

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.