Students Agitation : जे भल्या भल्या नेत्यांना, अभिनेत्यांना जमत नाही ते हिंदुस्थानी भाऊने कसे करुन दाखवलं? कसे जमा केले विद्यार्थी?

महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनामागे हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) या नावाने परिचित असलेला विकास पाठक (Vikas Pathak) हा व्यक्ती असल्याचं पहायला मिळत आहे. हिदुस्तानी भाऊ हा अनेक प्रकारे सोशल मीडियावर चर्चेत असतो. यावेळी पहिल्यांदाच तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.

Students Agitation : जे भल्या भल्या नेत्यांना, अभिनेत्यांना जमत नाही ते हिंदुस्थानी भाऊने कसे करुन दाखवलं? कसे जमा केले विद्यार्थी?
हिंदुस्तानी भाऊला जामीन
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 4:26 PM

मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (10th and 12th Exam) ऑनलाईन स्वरुपातच घेण्यात यावी या मागणीसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धारावीमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांमध्येही आज दहावी आणि बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनामागे हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) या नावाने परिचित असलेला विकास पाठक (Vikas Pathak) हा व्यक्ती असल्याचं पहायला मिळत आहे. हिदुस्तानी भाऊ हा अनेक प्रकारे सोशल मीडियावर चर्चेत असतो. यावेळी पहिल्यांदाच तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.

राज्यात कोरोनाचं सावट आहे. अद्यापही हजारो विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. अशावेळी दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मात्र, परीक्षा ठरलेल्या वेळेतच होईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आज परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी हिंदुस्तानी भाऊकडून करण्यात आली होती. तसंच त्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहनही केलं होतं. हिंदुस्तानी भाऊच्या या आवाहनाला हजारो विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आणि धारावी, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

हिंदुस्तानी भाऊच्या हाकेला हजारो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी हिंदुस्तानी भाऊने यूट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन काल केलं होतं. त्यानंतर आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. धारावीमध्ये वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी शेकडो विद्यार्थी जमले. तसंच औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नागपूरमध्येही शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर टीव्ही 9 मराठीने हिदुस्तानी भाऊशी संपर्क साधला असता त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज तीन महिने झाले हे विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज त्यांनी ऐकला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला तर मी वाईट झालो का? असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केलाय.

हिंदुस्थानी भाऊचं विद्यार्थ्यांना आवाहन

तसंच कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकला. तुम्ही सर्व बैठका ऑनलाईन घेता, मग विद्यार्थ्यांची परीक्षाच ऑफलाईन का? हे विद्यार्थी देशाचं भवितव्य आहेत. परीक्षा नको असं मी बोललोच नाही. फक्ती परीक्षा पुढे ढकला आणि ऑनलाईन पद्धतीने घ्या अशी आपली मागणी आहे. तीन महिन्यांपासून विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. मी आज सरकारला आवाहन करतोय की परीक्षा पुढे ढकला. खेडेगावात हजारो विद्यार्थी असे आहेत की त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेताच आलं नाही. लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना आवाहन केलं होतं. आता विद्यार्थ्यांनी मला आवाहन केलं की आमच्यासाठी उभे राहा, म्हणून आज त्यांच्यासाठी उभा आहे, असं हिंदुस्थानी भाऊने म्हटलंय. त्याचबरोबर हिंदुस्थानी भाऊने विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे की आता घरी जावं. मी वर्षा गायकवाड यांना निवेदन दिलं आहे. त्यात परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच त्यांची फी माफ करण्याची विनंतीही करण्यात आल्याचं हिंदुस्तानी भाऊने सांगितलं.

इतर बातम्या :

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ, ज्याच्या आवहानावर मुंबईत शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला घामटा फोडला?

मुंबईत शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळ, शेकडो विद्यार्थ्यांचा गायकवाडांच्या घराला घेराव, सरकारला घामटा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.