नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडणार? अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; सुधाकर बडगुजरेंचं सूचक वक्तव्य

काल झाले ते प्रवेश फक्त 'झांकी' आहे. भाजपचे बडे नेते अभी 'बाकी' आहे, अशा शब्दात सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी शिवसेना इनकमिंगविषयी सूचक वक्तव्य केलं आहे.

नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडणार? अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; सुधाकर बडगुजरेंचं सूचक वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 1:30 PM

नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आता शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचं मोठं विधान शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केलं आहे. बुधवारी शिवसेनेमध्ये असलेल्या बाळासाहेब सानप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यावर शिवसेनेकडून चांगलीच टीका करण्यात आली आहे. काल झाले ते प्रवेश फक्त ‘झांकी’ आहे. भाजपचे बडे नेते अभी ‘बाकी’ आहे, अशा शब्दात सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी शिवसेना इनकमिंगविषयी सूचक वक्तव्य केलं आहे. (Sudhakar Badgujar big statement many bjp leaders are coming in ShivSena in nashik)

भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये शिवसेनेत मोठं इनकमिंग होणार असल्याचं विधान बडगुजर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भाजपची अवस्था बिकट होणार असल्याचंही सुधाकर बडगुजर म्हणाले. त्यामुळे खरंच जर नाशिकमध्ये भाजपलं खिंडार पडलं तर हा आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

दरम्यान, बाळासाहेब यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेत पोकळी निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. अशात ही तर फक्त सुरुवात आहे महाविकास आघाडीचे अनेक नेते हे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याचं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर कोणत्या पक्षात इनकमिंग होतं हे येता काळच सांगेन.

महत्त्वाचं म्हणजे नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळून आठवडा होत नाही, तोच भाजपला सुरुंग लागला आहे. भाजपचे काही बडे नेते आणि नगरसेवक पुढच्या आठवड्यात सेना प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत सोमवारीत भाजपमध्ये घरवापसी केली. मात्र सानप यांच्या प्रवाशाने भाजपमधील अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातूनच भाजपचे नाशकातील दिग्गज नेते आणि नगरसेवक शिवबंधन हाती बांधण्याची शक्यता आहे. भाजपच्या उद्योग आघाडीचे पदाधिकारीही मुंबईत शिवसेना प्रवेश करणार आहेत. प्रवेशावेळी शिवसेना कार्यालयाला ते अॅम्ब्युलन्स भेट देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Sudhakar Badgujar big statement many bjp leaders are coming in ShivSena in nashik)

इतर बातम्या – 

सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?: राऊत

आम्ही कुणालाही झटके देत नाही; अनेकजण शिवसेनेत यायला इच्छुक: शंभुराज देसाई

(Sudhakar Badgujar big statement many bjp leaders are coming in ShivSena in nashik)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.