“14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती”

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती वाटत असल्याची घणाघाती टीका केलीय.

14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 2:31 PM

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकार आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी जोरदार विरोध केलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती वाटत असल्याची घणाघाती टीका केलीय. (Sudhir Mungantiwar criticizes Thackeray government’s over rainy session of legislature)

‘ठाकरे सरकारला भीती वाटतेय. 4 दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अधिवेशन जर 14 दिवसाचं झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकते’, असा जोरदार टोला मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला लगावलाय. तर नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत, दुसरीकडे अद्याप विधानसभा अध्यक्षांनी निवड झाली नाही, याबाबत विचारलं असता, ‘या तिन पक्षांमध्ये नाराजी होऊच शकत नाही. कारण, एकदा सत्तेची चटक लागली की नाराजी दोन दिवसांपुरती उरते. 19 तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधींचा वाढदिवस होता, त्या दिवशी केक खाऊ घालायचे, त्याच दिवशी जोडे खाऊ घालायची भाषा झाली. मी याकडे लक्ष देत नाही. या तीन पक्षांमध्ये कोण नाराज आहे याकडे आम्ही पाहत नाही तर जनता नाराज राहता कामा नये ही आमची भूमिका आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र डागलंय.

तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र- फडणवीस

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचं पावसाळी अधिवेशन होऊच नये, यासाठी कोरोनाचं कारण दिलं जात आहे, असा आरोप फडणवीसांनी केला.

‘प्रश्न विचारायचेच नाहीत का?’

फक्त दोन दिवसांच अधिवेशन असताना राज्यातल्या प्रश्नांवर चर्चा कशी करणार? विशेष अधिवेशन करण्याची गरज असताना आहे ते अधिवेशनही घेणार नाही अशीच सरकारची भूमिका आहे. लोकशाही बासनात गुंडाळायची सरकारची कार्यपद्धती आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काहीच भूमिका नाही. संसदीय लोकशाहीत ही गंभीर बाब आहे. अर्निबंध प्रशासन आणि मंत्री यांच्यावर प्रश्न विचारायचेच नाहीत का? असे प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले.

संबंधित बातम्या :

सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

नाना पटोलेंच्या ‘एकला चलो रे’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?; आघाडीत अस्वस्थता वाढली

Sudhir Mungantiwar criticizes Thackeray government over rainy session of legislature

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.