‘त्यांचा चेहरा लोकशाहीचा, आत्मा हुकूमशाहीचा आणि कृती परिवाराच्या सेवेची’, मुनगंटीवारांचा नाना पटोलेंवर निशाणा

अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित किंवा त्यांच्या चित्रुपटांचे शूटिंग होऊ देणार नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला (Sudhir Mungantiwar slams Nana Patole).

'त्यांचा चेहरा लोकशाहीचा, आत्मा हुकूमशाहीचा आणि कृती परिवाराच्या सेवेची', मुनगंटीवारांचा नाना पटोलेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 4:34 PM

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित किंवा त्यांच्या चित्रुपटांचे शूटिंग होऊ देणार नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे. “नाना पटोले यांच्या भावनेतून आणि भाषेतून खरा काँग्रेसचा चेहरा व्यक्त होत आहे. त्यांचा चेहरा लोकशाहीचा, आत्मा हुकूमशाहीचा आणि कृती परिवाराची सेवा करायची, असं काँग्रेसचं वर्णन आहे”, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला (Sudhir Mungantiwar slams Nana Patole).

“खरंतर नाना पटोले आमचे मित्र आहेत. ज्या पद्धतीने ते सांगत आहेत, देशात काळे कायदे लागू झाले, असं बोलत आहेत. पण कायदे कोणते, ते मात्र ते बोलत नाहीत. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांपैकी दोन कायदे आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याबद्दल ब्र सुद्धा काढत नाहीत. ते कायदे रद्द झाले पाहिजेत, असं बोलत नाहीत. केंद्राने केलेले कायदे काळे कायदे, यांनी तेच कायदे केले ते मात्र सफेद कायदे”, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला (Sudhir Mungantiwar slams Nana Patole).

“खरंतर मावळच्या शेतकऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीने गोळीबार केला होता, तेव्हा हेच नाना पटोले काँग्रेस विरोधात बोलत होते. काँग्रेस शेतकरीविरोधी आहे. काँग्रेसचं शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम पुतना माऊशीचं आहे. काँग्रेस किती वाईट आहे, याचं वर्णन नाना पटोले यांनी 2009 च्या विधानसभेच्या भाषणात केलं होतं. त्यांचं 2009 पासूनचं विधानसभेतील भाषण तुम्ही काढलं तर काँग्रेसच्या आजच्या प्रदेशाध्यक्षाचं काँग्रेसबद्दल व्यक्त केलं गेलेलं मत दिसेल”, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

‘काँग्रेस शेतकरीविरोधी आहे, असं नाना पटोले स्वत: म्हणाले’

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अक्षय कुमार किंवा अमिताभ बच्चन यांनी काही ट्विट केलं असेल तर नाना पटोले यांनी सुद्धा काँग्रेस शेतकरी विरोधी आहे, असं मत व्यक्त केलं होतं. नाना पटोले स्वत:वर बहिष्कार टाकतील का? जसं मी त्यांच्या शूटिंगवर बहिष्कार टाकण्याची भाषा करतोय. मी शेतकरीविरोधी काँग्रेस आहे, असं सांगितलं होतं. म्हणून आता मी स्वत:वर बहिष्कार टाकेन, असं ते म्हणतील का?”, असा सवाल त्यांनी केला.

“लोकशाही आहे. एखाद्याने आपलं मत मांडण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. तुम्ही अतिशय निम्न शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत उल्लेख करता, पंतप्रधान या पदाचादेखील सन्मान ठेवत नाही. पण म्हणून कुणी तुमच्यावर बहिष्कार टाकला नाही”, असं मुनगंटीवार यांनी सुनावलं.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

संबंधित बातम्या :

मोठ्या अभिनेत्यांबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी, देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

…तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.