Suhas Kande : नांदगावमध्ये पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा लगेच राजीनामा देतो; सुहास कांदे यांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

Suhas Kande : आम्ही माणसं आहोत. हिंदुत्ववादी आहोत. किती दिवस शांत बसायचं? उठाव करायचाच नाही का? बाळासाहेबांनी शांत बसायला शिकवलं नाही. बाळासाहेबांनी नेहमीच लढायला शिकवलं आहे. त्यामुळेच आम्ही उठाव केला आहे. ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल.

Suhas Kande : नांदगावमध्ये पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा लगेच राजीनामा देतो; सुहास कांदे यांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान
नांदगावमध्ये पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा लगेच राजीनामा देतो; सुहास कांदे यांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 9:53 AM

नाशिक : आदित्य ठाकरेंबद्दल (aaditya thackeray) आदर आहे. ठाकरे घराण्याबद्दलही आदर आहे. पण माझे आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे आदित्य यांनी नांदगाव विधानसभेच्या मतदारांसमोर द्यावीत. त्यांनी जर उत्तरे दिली तर मी ताबडतोब त्याच मिनिटाला राजीनामा देतो. मी परत निवडणूक लढवतो. परत बाळासाहेबांचा सैनिक म्हणून निवडणूक लढून विधानसभेत पोहोचेल, असं सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पर्यटन खात्याचा निधी का दिला नाही? पर्यटन खात्याचा एक प्रकल्प नांदगावमध्ये दाखवा मी लगेच राजीनामा देतो, असं आव्हानच शिंदे गटाचे बंडखोर आमदार सुहास कांदे (suhas kande) यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी हे आव्हान दिलं. तसेच आम्ही बंडखोरी केली नाही. आम्ही उठाव केला आहे. आम्ही गद्दार नाही. बंडखोर नाही. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक (shivsena) आहोत. त्यांचे विचार घेऊनच पुढे जात आहोत, असा दावाही सुहास कांदे यांनी केला.

आम्ही माणसं आहोत. हिंदुत्ववादी आहोत. किती दिवस शांत बसायचं? उठाव करायचाच नाही का? बाळासाहेबांनी शांत बसायला शिकवलं नाही. बाळासाहेबांनी नेहमीच लढायला शिकवलं आहे. त्यामुळेच आम्ही उठाव केला आहे. ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल. त्या दिवशी मी शिवसेना गुंडाळेल, असं बाळासाहेबच म्हणायचे. त्याच बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालत आहोत, असं सुहास कांदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सुहास कांदेंचे आदित्य ठाकरेंना सवाल

  1. ज्यांनी आनंद दिघेंच्या माध्यमातून वयाच्या 16व्या वर्षापासून राजकारण सुरू केलं. त्या एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना सुरक्षा दिली नाही. त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यायला हवी होती. हिंदुत्वाच्या विरोधकांना सुरक्षा दिली. पण शिंदेंना दिली नाही. ती का दिली नाही? सकाळी 8.30 वाजता शंभुराजे देसाईना वर्षावरून फोन आला. शिंदेंना सेक्युरिटी देऊ नका म्हणून. का दिली नाही शिंदेंना सेक्युरीटी?
  2. ज्या याकूब मेमनने हिंदू मारले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्याला कोर्टाने फाशी दिली. त्याला फाशी देऊ नये म्हणून एक पत्रक काढण्यात आलं. त्यावर अस्लम शेख आणि नवाब मलिकांची सही होती. त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसायचे का?
  3. दाऊदने रेल्वेत बॉम्बस्फोट घडवले. त्याच्यासोबत नवाब मलिकांचे कनेक्शन निघालं. त्या मलिकांचा तुरुंगात असतानाही राजीनामा घेतला नाही. त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसायचं का?
  4. पालघरमध्ये साधूंची हत्या झाली. दोन दिवसात आरोपींना जामीन झाला. तरीही आम्ही गप्प बसायचे?
  5. सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवलं गेलं. आमची घुसमट झाली. तोंड दाबून बुक्क्यांचा मार झाला. तरीही आम्ही काँग्रेससोबत सत्तेत राहायचे का?
  6. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पर्यटन खात्यातून नांदगावमध्ये छत्रपती महाराजांचा अश्वारुढ पुतळा का दिला नाही? 50 पत्रं दिले, पण त्यावर उत्तर नाही. आंबेडकर स्मारकासाठी अनेकदा पत्रं दिलं. का नाही स्मारक उभारू दिलं? राजामाता आहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारायचं होतं. मी अनेकदा पत्रं दिले. त्यावरही निर्णय घेतला नाही. आदित्य ठाकरेंना दिलेल्या साडेसातशे पत्रांच्या झेरॉक्स माझ्याकडे आहेत.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.