AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार, शिंदे गटाची मोठी खेळी; अंधारे बॅकफूटवर जाणार?

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार, शिंदे गटाची मोठी खेळी; अंधारे बॅकफूटवर जाणार?
सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 13, 2022 | 11:08 AM
Share

ठाणे: ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. अंधारे यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. वाघमारे यांना शिंदे गटात मोठं पदही दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुषमा अंधारे या बॅकफूटवर जाव्यात म्हणून शिंदे गटाने ही मोठी खेळी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अंधारे बॅकफूटवर जातात की अधिक आक्रमक होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार आहे. मात्र, वाघमारे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवल्याचं सांगितलं जात आहे.

सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने अंधारे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद दिलं. सुषमा अंधारे यांनी या संधीचं सोनं करत अल्पावधीतच पक्षात आणि राज्यात आपली छाप उमटवली. एवढेच नव्हे तर आपल्या अचूक आणि अभ्यासपूर्ण विधानांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलं.

विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांच्या रडारवर शिंदे गट आहे. त्या शिंदे गटावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्यांनी शिंदे गटांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट हल्लाबोल केला.

त्यामुळे शिंदे गटाची पळताभूई थोडी झाली आहे. त्यामुळेच शिंदे गटाने सुषमा अंधारे यांना टेन्शन देण्यासाठी वैजनाथ वाघमारे यांना आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न करून मोठी खेळी केली आहे.

शिंदे गटाच्या या राजकीय खेळीला आता सुषमा अंधारे कशा उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर वैजनाथ वाघामारे हे सुषमा अंधारे यांच्यासारखीच आक्रमक भूमिका मांडतात का? याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.