रावसाहेब दानवे आमचा गोरापान भाऊ, तर भुमरे कामचुकार भाऊ; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

मी आता एका एका भावाची काळजी घेत बोलत बोलत पैठणमध्ये आले आहे. मी बहीण आहे आणि मी माझ्या भावाला ओवाळायला आले आहे.

रावसाहेब दानवे आमचा गोरापान भाऊ, तर भुमरे कामचुकार भाऊ; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
रावसाहेब दानवे आमचा गोरापान भाऊ, तर भुमरे कामचुकार भाऊ; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 9:32 AM

औरंगाबाद: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. रावसाहेब दानवे आमचा गोरापान भाऊ आहे. पण ते चकवा आहेत. तर संदीपान भुमरे हे आमचे कामचुकार भाऊ आहेत, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. औरंगाबाद येथील सभेला संबोधित करताना त्यांनी या दोन्ही नेत्यांना लक्ष्य केलं.

मी आता एका एका भावाची काळजी घेत बोलत बोलत पैठणमध्ये आले आहे. मी बहीण आहे आणि मी माझ्या भावाला ओवाळायला आले आहे. माझ्या या भावाने लोकांसाठी काम केलं. आमच्या भावाने लोकांची गरज ओळखली.

हे सुद्धा वाचा

इथे औषध गोळ्या नाही मिळाल्या, प्यायला नाही मिळालं तरी चालतं. पण इथे 30, 60, 90 ची व्यवस्था केली. आता भाऊ आहे माझा म्हणून माहिती आहे मला. माझी वहिनी म्हणजे भुमरे यांच्या पत्नी भाषण ऐकत असतील, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री असताना 890 कोटींचा निधी दिला. पण यांनी किती खावे. किमान संदीपान भुमरे यांनी खाल्ल्यानंतर ढेकर तरी द्यावा ना. पैठण-औरंगाबादच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. म्हणून सभेला यायला उशीर झाला. भुमरे यांच्यामुळेच पैठणची दुरावस्था झाली आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

पैठणमध्ये भुमरे यांनी काय दिवे लावले? राज्यातील देवस्थाने सुंदर आहेत. परंतु पैठण आणि नाथ मंदिराची दुरावस्था झाली आहे. पैठणकडे रावसाहेब दानवे यांनीही लक्ष दिले नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

रावसाहेब दानवे यांननी अनेक विकास कामे दुसरीकडे वळवली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निधीन मिळाला नाही. त्यातच दानवे यांननी आपल्या जवळच्या लोकांना कामे दिली, असा आरोप त्यांनी केला.

लोकांना संताप येणारी खाते शिंदे गटाकडे आहेत. आणि मलिद्याची खाते भाजपकडे आहेत. फडणवीस 6 जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत, ते काय रॉबिनहूड आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.

इडापिडा जाऊ दे. माझ्या भावाचे म्हणजे संदीपान भुमरे यांचे राज्य येऊ दे. यांना मंत्रीपदे मिळाली असली तरी राज्य मिळाले नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. पण त्यांची फाईल फडणवीस यांच्याकडे जाते.

फडणवीस शिंदेंना बोलू देत नाहीत. केवळ ब्राह्मणेत्तर मुख्यमंत्री केल्याचं दाखवायचं होतं म्हणून शिंदेंना मुख्यमंत्री केलं. ही भाजपची कुटनीती आहे. पण मुख्यमंत्री शिंदेंना हे कळत नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.