AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलची जुलमी दरवाढ मागे घ्या अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करू: नाना पटोले

अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्ष यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. Nana Patole petrol diesel prices

पेट्रोल-डिझेलची जुलमी दरवाढ मागे घ्या अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करू: नाना पटोले
नाना पटोले
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 6:34 PM
Share

मुंबई: पेट्रोल-डिझेलची जुलमी दरवाढ मागे घ्या अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करू, असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर लादून जनतेचे खिसे कापत आहे. या अन्यायी जुलमी, अत्याचारी दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आज राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला आहे. मोदी सरकारने ही जुलमी करवसुली कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्ष यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. (Take back the oppressive hike in petrol and diesel prices, otherwise we will have a big agitation in the future says Nana Patole)

पेट्रोल पंपावर इंधन आणि गॅस दरवाढीविरोधातील आंदोलनात सहभाग

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील पेट्रोल पंपावर इंधन आणि गॅस दरवाढीविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, राजा तिडके, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी आदी उपस्थित होते.

कोरोनाने दीड वर्षापासून लोकांचे उत्पन्न कमी झाले

वडसा येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कोरोनाने दीड वर्षापासून लोकांचे उत्पन्न कमी झाले, उद्योग धंदे बंद आहेत, लाखो लोकांचे रोजगार गेले, कठीण परिस्थितीत लोक जगत असताना त्यात इंधन दरवाढ आणि महागाईने लोकांचे जगणे मुश्कील झाले. यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांनी इंधनाच्या महागाईची झळ लोकांना बसू नये म्हणून दर स्थिर ठेवून जनतेला दिलासा होता, परंतु मोदी सरकार मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव कमी असतानाही भरमसाठ कररूपाने लोकांच्या खिशावर दरोडे टाकून नफेखोरी करत आहे.

प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

राज्यव्यापी आंदोलनात ठाणे येथे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत शिंदे, रवींद्र आंग्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील 35 पेट्रोल पंपांसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कसबा विधानसभा मतदारसंघातील कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक, सांगली, अहमदनगर, नांदेड, मालवण, अमरावती, सावंतवाडी, कणकवली, बुलढाणा, नांदेड, औरंगाबाद यासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. राज्यातील एक हजार पेट्रोल पंपांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकाचवेळी आंदोलन करून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध केला. यावेळी मोदी सरकार जुलमी दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

संबंधित बातम्या

भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय, नाना पटोलेंचा घणाघात

‘भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, आता चोराच्या उलट्या बोंबा’, पटोलेंचा पलटवार

Take back the oppressive hike in petrol and diesel prices, otherwise we will have a big agitation in the future says Nana Patole

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.