Solapur : गद्दारीची बीजे एक वर्षापूर्वीच पेरलेली, विनायक राऊतांची बंडखोर आमदारांवर सडकून टीका

शिवसेना कुणाची यावरुन राज्याचे राजकारण पेटले आहे. शिवाय शिंदे गट हा पक्षावर दावा करीत आहे तर दुसरीकडे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यासंदर्भातील निर्णय आता सोमवारी होणार आहे. त्याअनुशंगाने राज्याचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे राहणार आहे. या निकालाच्या अनुशंगाने सुनावणीसाठी सुभाष देसाई, अनिल देसाई , अनिल परब दिल्लीला रवाना होणार आहेत.

Solapur : गद्दारीची बीजे एक वर्षापूर्वीच पेरलेली, विनायक राऊतांची बंडखोर आमदारांवर सडकून टीका
खा. विनायक राऊत Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 5:49 PM

सोलापूर :  (Eknath Shinde) शिंदे सरकार स्थापन होऊन आता दीड महिना झाला आहे. असे असले तरी शिवसेना आणि शिंदे गटातील आमदार यांच्यातील टीकेचे बाण अद्यापपर्यंत संपलेले नाहीत. शिवसेनेने बंडखोर आमदारांना टार्गेट करीत त्यांच्या मतदार संघात आणि जिल्ह्यात जाऊन त्यांच्यावर टीका करण्याचा धडाका सुरु केला आहे. (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात हजेरी लावली तर आता (Vinayak Raut) खा. विनायक राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी सोलापुरात मंत्री तानाजी सावंत आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ही बंडखोरी अचानक झालेली नाहीतर याची बीजे ही वर्षाभरापासून पेरली गेल्याचा आरोप त्यांनी केला. तर शिवसेनेला वाढता प्रतिसाद पाहून ते आज दोन पॅक जास्त मारणार म्हणत त्यांनी पाटलांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले होते. विनाय राऊत यांनी सोलापूर, पंढरपूर आणि सांगोल्यात कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन हे आरोप केले आहेत.

…तर भाजपाचाच आधार घ्या

शिवसेना पक्षाबरोबर गद्दारीच करायची होती तर आता पक्षावर दावा कशासाठी करीत आहात असा प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवाय आता या बंडखोर आमदारांना इतर पक्षामध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही. याबाबत निर्णय लवकरच होईल पण ज्यांनी पक्षाबरोबर गद्दारी केली ते आता चिन्हावर आणि पक्षावर दावा करीत आहेत, हे दुर्देव असून या बंडखोर आमदरांनी आता भाजपाचाच आधार घ्यावा असा सल्ला विनायक राऊत यांनी दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

शिवसेना कुणाची यावरुन राज्याचे राजकारण पेटले आहे. शिवाय शिंदे गट हा पक्षावर दावा करीत आहे तर दुसरीकडे शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यासंदर्भातील निर्णय आता सोमवारी होणार आहे. त्याअनुशंगाने राज्याचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे राहणार आहे. या निकालाच्या अनुशंगाने सुनावणीसाठी सुभाष देसाई, अनिल देसाई , अनिल परब दिल्लीला रवाना होणार आहेत. तर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणीस सुरवात होणार आहे.

हे सुद्धा वाचा

गद्दार शिक्का हा कायमचा

शिवसेनेतून बंड म्हणजे या आमदारांनी घर फोडण्याचा प्रकार केला आहे. शिवाय शिवसेनेशी अशी भूमिका घेतल्यावर काय होते याचा इतिहास आहे. पण स्वार्थासाठी या गद्दारांनी हा निर्णय घेतला होता. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गद्दार हाच शब्द योग्य आहे. हे नामकरण कोणी केले नाही तर गद्दार हीच त्यांची ओळख झाली आहे. त्यामुळे जेव्हा हे महाराष्ट्रात फिरतेल तेव्हा त्यांची ओळख ही गद्दारच असणार असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.