Sanjay Raut : मला ज्या ठिकाणी ठेवलं तिथे योग्य व्हेंटिलेशन नाही, राऊतांची तक्रार; कोर्टाने ईडीला झापलं

Sanjay Raut : एका अनोळखी व्यक्तीकडून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात कोट्यवधी रुपये आले आहेत. हे पैसे कुठून आले? त्याचा तपास आम्हाला करायचा आहे. तसेच राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्याकडून 1 कोटी 6 लाख रुपये कसे आले याचीही चौकशी करायची आहे.

Sanjay Raut : मला ज्या ठिकाणी ठेवलं तिथे योग्य व्हेंटिलेशन नाही, राऊतांची तक्रार; कोर्टाने ईडीला झापलं
मला ज्या ठिकाणी ठेवलं तिथे योग्य व्हेंटिलेशन नाही, राऊतांची तक्रार; कोर्टाने ईडीला झापलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 1:41 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. राऊत यांनी कोर्टात ईडीच्या (ED) विरोधात तक्रार केली आहे. मला ज्या खोलीत ईडीने ठेवलंय तिथे व्हेंटिलेशन व्यवस्थित नाही, अशी तक्रार संजय राऊत यांनी कोर्टाला (court) केली आहे. कोर्टाने राऊत यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ईडीला झापलं आहे. ही गंभीर बाब असल्याचं ईडीने म्हटलं असून ईडीने त्यावर लेखी माफी मागितली आहे. पण राऊत चुकीची माहिती देत असल्याचं सांगत राऊत यांना एसी रुम देणार असल्याचं ईडीने कोर्टाला लेखी लिहून दिलं आहे. राऊत यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात आणण्यात आलं आहे. त्यांच्या जामिनावर आज सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे कोर्ट राऊतांना जामीन देणार की त्यांना कोठडी सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात कोर्टाकडून याबाबत निर्णय येणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात आणण्यात आलं. राऊत यांना कोर्टात आणताच तुम्हाला ईडी कोठडीत काही त्रास झाला का? असा सवाल कोर्टाने राऊतांना विचारला. त्यावर मला ज्या खोलीत ठेवलं आहे. तिथे व्हेंटिलेशन व्यवस्थित नाही, असं राऊत म्हणाले. तसेच आपल्याला पंखा देण्यात यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. राऊतांच्या या तक्रारीची कोर्टाने गंभीरपणे दखल घेत ईडीला फटकारलं.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत चुकीची माहिती देत आहेत

ईडीच्या कोठडीत व्हेंटिलेशन नाही ही गंभीर बाब आहे. आता तुम्ही काय करणार आहात हे सांगा? अशी विचारणा कोर्टाने ईडीला केली. त्यावर ईडीने कोर्टाची आधी माफी मागितली. त्यानंतर राऊत चुकीची माहिती देत आहेत. त्यांना आम्ही एसी रुममध्ये ठेवलं आहे. त्यांना पुन्हा दुसऱ्या एसी रुममध्ये ठेवणार आहोत, अशी लेखी माहिती ईडीने कोर्टाला दिली आहे.

10 तारखेपर्यंत कोठडी द्या

यावेळी ईडीच्या वकिलाने राऊत यांच्या खात्यात आलेल्या रकमेची माहिती कोर्टाला दिली. एका अनोळखी व्यक्तीकडून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात कोट्यवधी रुपये आले आहेत. हे पैसे कुठून आले? त्याचा तपास आम्हाला करायचा आहे. तसेच राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्याकडून 1 कोटी 6 लाख रुपये कसे आले याचीही चौकशी करायची आहे. या शिवाय राऊत यांच्या परदेश दौऱ्याच्या खर्चाची माहितीही घ्यायची आहे. शिवाय अलिबागमध्ये रोख रकमेने जमीन खरेदी करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांच्याच पैशातून ही जमीन खरेदी केली आहे. त्याचा आम्हाला तपास करायचा आहे. त्यामुळे राऊत यांची 10 तारखेपर्यंत कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलाने केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.