येत्या आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

शिवसेना नेते संजय राठोड यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. (third maharashtra minister will resign within week, says chandrakant patil)

येत्या आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ
Chandrakant Patil
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 10:22 AM

पुणे: शिवसेना नेते संजय राठोड यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र, या मंत्र्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ठाकरे सरकारमधील कोणता मंत्री राजीनामा देणार? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. (third maharashtra minister will resign within week, says chandrakant patil)

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे. येत्या आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार आहे. तो मंत्री कोण आहे, हे तुम्हीच शोधा, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच तुमच्या कर्माने तुम्हीच मरणार आहात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

स्वबळाचा नारा

भाजपचा आज वर्धापन दिन होता. त्यामुळे आम्ही सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढून चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही 2024मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. कुणाच्याही कुबड्या आम्हाला नकोत. अर्थातच आमचे सहयोगी पक्ष आमच्यासोबत असतीलच, असंही ते म्हणाले. स्वबळावर लढून राज्यात सरकार आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनवरून फसवणूक

यावेळी त्यांनी लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारवर टीका केली. लॉकडाऊनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फसवणूक केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी विकेंड लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र पत्रक पूर्ण लॉकडाऊनचं काढण्यात आलं, अशी टीका त्यांनी केली.

म्हणून देशमुखांच्या दिल्लीवाऱ्या

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावरही टीका केली. चौकशीपासून वाचण्यासाठीच अनिल देशमुखांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली.

बापटांचा काँग्रेसला टोला

आजपर्यंत भाजपचे शेकडो कार्यकर्ते मारले गेले आहेत. एकट्या पश्चिम बंगालमध्ये संघ आणि भाजपच्या 157 कार्यकर्त्यांची हत्या झाली. पक्ष या कार्यकर्त्यांचे बलिदान कधी विसरणार नाही. कार्यकर्ता हा भाजप पक्षाचा प्राण आहे, असे खासदार गिरीश बापट यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 योजना सुरु केल्या पण एकाही योजनेला स्वत:चे नाव दिले नाही. काँग्रेसच्या काळात इंदिरा आवास, संजय गांधी योजना सुरु करण्यात आल्या. त्या एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या का? ते मोठे असतीलही पण देशापेक्षा मोठे नाहीत, असा टोलाही गिरीश बापट यांनी लगावला. (third maharashtra minister will resign within week, says chandrakant patil)

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले: चंद्रकांत पाटील

रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन

मोठी बातमी: मुंबईतील दुकानं बंद ठेवणार नाही; ठाकरे सरकारच्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचे बंड

(third maharashtra minister will resign within week, says chandrakant patil)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.