Nitish Kumar : आम्ही राहू, न राहू, पण 2024मध्ये ते राहणार नाहीत; मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नितीश कुमार गरजले!

Nitish Kumar : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्वच प्रादेशिक पक्ष संपतील. फक्त भाजप राहील. शिवसेनाही संपुष्टात येईल, असं धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सर्वच विरोधी आणि प्रादेशिक पक्षांनी भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.

Nitish Kumar : आम्ही राहू, न राहू, पण 2024मध्ये ते राहणार नाहीत; मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नितीश कुमार गरजले!
आम्ही राहू, न राहू, 2024मध्ये ते राहणार नाहीत; मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नितीश कुमार गरजले!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 3:19 PM

पाटणा: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपवर प्रहार केला आहे. खासकरून भाजपचे (bjp)  राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda) यांच्यावर नितीश कुमार यांनी पलटवार केला आहे. काही लोकांना वाटतं विरोधी पक्ष संपुष्टात येईल. पण आता आम्हीही विरोधी पक्ष आहोत. 2014मध्ये आलेले 2024मध्ये राहतील तर ना? आम्ही राहू, न राहू, पण 2024मध्ये ते राहणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला आहे. तसेच विरोधी पक्षांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र यावं असं मी आवाहन करत आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान पदाचे आपण दावेदार नसल्याचंही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. नितीश कुमार यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्वच प्रादेशिक पक्ष संपतील. फक्त भाजप राहील. शिवसेनाही संपुष्टात येईल, असं धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सर्वच विरोधी आणि प्रादेशिक पक्षांनी भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि उपेंद्र कुशवाहा यांनी भाजपवर पलटवार केला आहे. आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनीही नड्डा यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. आम्ही राहू, न राहू. पण 2024मध्ये ते सत्तेत राहणार नाहीत, असा इशाराच नितीश कुमार यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नड्डा यांच्यावर टीका केली आहे. भाजप मित्र पक्षांना संपवण्याचं काम करत आहे. प्रकाश सिंह बादल यांच्यासोबत असंच झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेसोबतही तेच करण्यात आलं. आता बिहारमध्येही असच होणार होतं. पण महाराष्ट्रात जे झालं, त्यामुळे नितीश कुमार सावध झाले. भाजपसोबत राहिल्यावर आपल्यासोबतही धोका होईल हे नितीश कुमार यांना कळून चुकलं. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा दिला आणि भाजपपासून वेगळे झाले, असं पवार म्हणाले.

आम्ही झुकणार नाही

हिंदी पट्ट्यात भाजपची कुणासोबतही युती राहिलेली नाही. भाजपने नेहमीच आपल्या सहकाऱ्यांना राजकारणातून नामशेष केल्याचा इतिहास आहे. पंजाब आणि महाराष्ट्रात तेच घडलं. बिहारमध्येही तेच होणार होतं. हे आता लपून राहिलं नाही. लोकांना घाबरवणं आणि खरेदी करणं एवढंच भाजपला माहीत आहे. बिहारमध्ये भाजपचा अजेंडा लागू होऊ नये असं आम्हाला वाटत होतं. लालूप्रसाद यादव यांनी तर लालकृष्ण अडवाणी यांचा रथ रोखला होता. आम्ही कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.