तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक; शिवसेनेचा विजय, यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का

एका महिन्यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) तिवसा नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 12  जागांवर दणदणीत विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन करणाऱ्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना मात्र आता त्यांच्याच मतदार संघातील तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीत (Election) मोठा धक्का बसला आहे.

तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक; शिवसेनेचा विजय, यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 7:03 AM

अमरावती : एका महिन्यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) तिवसा नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 12  जागांवर दणदणीत विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन करणाऱ्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना मात्र आता त्यांच्याच मतदार संघातील तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीत (Election) मोठा धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलचा दारुण पराभव झाला असून 13 पैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रणित शेतकरी सहकार पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, विरोधी काँग्रेस गटाला मात्र एकही जागा मिळविता आली नाही. हा काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासाठी मोठा झटका मानण्यात येत आहे.

शिवसेनेची बाजी

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात दोन गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेली तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीचे निकला देखील लागले आहेत. हाती आलेल्या निकालात शिवसेना प्रणित शेतकरी सहकार पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्व 13 जागांवर शिवसेना प्रणित शेतकरी सहकार पॅनलचा विजय झाला. तर दुसरीकडे काँग्रेस प्रणित गटाला भोपळा देखील फोडता आला नाही.  या निवडणुकीसाठी 543 सदस्यांनी मतदान केले.

चुरसीची निवडणूक

या  निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस बघायला मिळत होती. निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेची प्रतिष्ठ पणाला लागली होती. त्यातच एक महिन्यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने 17 पैकी 12  जागांवर बाजी मारून सत्ता काबीज केली होती. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड माणण्यात येत होते. मात्र शिवसेना प्रणित पॅनलने काँग्रेसला जोरदार धक्का देत, सत्ता काबीज केली आहे. मंत्री यशमोती ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Maratha Reservation : गृहमंत्र्यांनी घेतली संभाजीराजेंची भेट, उपोषण मागे घेण्याची विनंती; संभाजीराजेंचा निर्णय काय?

Russia-Ukraine Crisis : रशियाचा युक्रेनच्या बंदरांवर कब्जा करण्याचा प्रयत्न, शहरांमध्ये युक्रेनची कडवी झुंज

Video:चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?-राज्यपाल कोश्यारी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.