दोन्ही मित्रपक्षांमध्ये हालचाली, शिंदे गट आणि भाजप यांच्यात रत्नागिरीत काहीतरी घडतंय?

सकाळी सकाळीच मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांनी रोकेगा कोण? म्हणत व्हाट्सअ‍ॅप स्टेट्स ठेवलं. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाली. मात्र काही वेळातच किरण सामंतांनी घुमजाव केला आणि भाजपच्या रविंद्र चव्हाणांनाही उमेदवारी मिळाल्यास हरकत नसल्याचं म्हटलं.

दोन्ही मित्रपक्षांमध्ये हालचाली, शिंदे गट आणि भाजप यांच्यात रत्नागिरीत काहीतरी घडतंय?
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 9:15 PM

मनोज लेले, Tv9 मराठी, रत्नागिरी | 1 जानेवारी 2024 : “मी…किरण रवींद्र सावंत…रोकेगा कौन?”, हे व्हाट्सअ‍ॅप स्टेट्स शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांचं आहे. त्यांचे आगामी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत स्पष्ट आहेत. मात्र या स्टेट्सवरुन उलटसुलट चर्चा सुरु असतानाच पत्रकार परिषद घेऊन किरण सामंतांनी घुमजाव केला. फुकट प्रसिद्धीसाठी स्टेट्स ठेवल्याचं किरण सामंत म्हणाले आहेत. किरण सामंत आपल्या स्टेट्समधून कायम, स्वत:चे भाऊ मंत्री उदय सामंतांसह शिंदे गटाचाही बीपी वाढवण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांआधीच त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या मशाल चिन्हाचा फोटो डीपी म्हणून ठेवला होता. जो होगा वो देखा जायेगा असं स्टेट्सही ठेवलं होतं. आता त्यांचं रोकेगा कौन? हे स्टेट्स चर्चेत आलंय.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिंदे गट आणि भाजपमध्येच रस्सीखेच आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाणांनी तयारी सुरु केलीय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेही तिकीटाच्या स्पर्धेत आहेत. शिंदे गटाकडून उदय सामंतांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. विशेष म्हणजे रोकेगा कौन, असं स्टेटस् ठेवणाऱ्या किरण सामंतांनी काही तासांतच जर रवींद्र चव्हाणांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करणार असं सांगून जागा सोडण्याचीही तयारीही दर्शवली. मात्र शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिंदे गटाचीच असल्याचा दावा करत किरण सामंतांचं नावही पुढं केलं.

भाजपच्या दोन नेत्यांची नावे चर्चेत

जागा वाटपावरुन भाजपचंही दुमत नसेल असं केसरकर म्हणत असले तरी भाजपचं इकडे लक्ष आहेच. रविंद्र चव्हाणांसह निलेश राणेही चर्चेत आहेत. वरिष्ठ ऐकून घेत नाही असं सांगून 2 महिन्यांआधीच,निलेश राणेंनी थेट राजकीय सन्यासच घोषित केला. त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रविंद्र चव्हाणांची पुढाकार घेतला आणि निलेश राणेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावरही आणलं. त्यानंतर पूर्वी प्रमाणेच निलेश राणेंचा झंझावात दिसेल असं रविंद्र चव्हाण म्हणाले. म्हणजे निलेश राणेंही तिकीटाच्या स्पर्धेत आहेतच.

महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

भाजप आणि शिंदे गटाकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तर त्यांचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊतांशीच असेल. तर महाविकास आघाडीत दुसरा तगडा उमेदवार नाही. 2009मध्ये काँग्रेसकडून निलेश राणे खासदार झाले होते. 2014 आणि 2019मध्ये सलग दुसऱ्यांदा विनायक राऊत खासदार झालेत. 2019ला निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत अशीच लढत झाली होती. त्यावेळी नारायण राणेंनी काढलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे उभे राहिले होते. विनायक राऊतांना 4 लाख 58 हजार मतं, तर निलेश राणेंना 2 लाख 79 हजार मतं मिळाली. निलेश राणेंचा 1 लाख 78 हजार मतांनी पराभव झाला. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विनायक राऊत तयारच आहेत. आता थेट लढण्याआधी, तिकीटाचा सामना भाजप-शिंदे गटाच्या युतीमध्येच आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.