Ajit Pawar Live | 440 चा करंट म्हणजे मरुन जाईन, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Political Updates Live | केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले आहेत.

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयागाने शुक्रवारी 17 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील नेतेमंडळी चांगलेच आक्रमक झाले. उद्धव यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरुन संताप व्यक्त केला. तसेच देशात हुकुमशाही असल्याचं म्हटलं. तसेच भाजपवरही निशाणा साधला. उद्धव यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही म्हटलं. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांनी कलानगर परिसरात जीपमधून भाषण केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी कारवर उभं राहून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उर्जा फुंकण्याचं काम केलं होतं, त्याच प्रकारे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. तसेच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
Ajit Pawar Live | 440 चा करंट म्हणजे मरुन जाईन, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar Criticize to chandrashekhar bawankule | 440 चा करंट म्हणजे मी मरुन जाईन, अजित पवार यांचा बावनकुळे यांना टोला
“अरे बापरे 440 चा करंट म्हणजे मी मरुन जाणार. एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा जगू शकतोय. अरेरे, मी आता माझ्या मतदारांना, माझ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल”, दादांचं बावनकुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजित पवार यांना 440 चा करंट द्या, बावनकुळे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीवर केली होती टीका.
-
Shinde vs Thackeray Live | शिंदे-ठाकरे गट आमनेसामने
Eknath Shinde and Uddhav Thackeray Followers dispute Live | केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर ठाकरे गट आणि निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशी परिस्थिती असताना पुण्यात शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. आधी परिस्थिती हाताबाहेर गेली.मात्र पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केली.
-
-
Uddhav Thackeray Speech Live | उद्धव ठाकरे आक्रमक
Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे यांनी जीपमधून उभं राहून वांद्रे येथील कलानगर चौकात कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरली. उद्धव यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णायवरुन संताप व्यक्त केला. तसेच शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. तसेच आगामी निवडणुकींसाठी तयारीला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली.
Published On - Feb 18,2023 3:34 PM





