AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका एकाला काय फोडता, एकदाच्या निवडणुका घ्याच; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ललकारले

मिंधे आणि भाजपला सांगतो. दर आठवड्याला माझा एक एक माणूस फोडत राहा. बिनकामाचे माणसं घ्या. ते घेतल्यावर माझ्या शिवसैनिकात ऊर्जा संचारते. काही लोक गेल्याने शिवसेना जोरात उभी राहते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एका एकाला काय फोडता, एकदाच्या निवडणुका घ्याच; उद्धव ठाकरे यांनी भाजपला ललकारले
| Updated on: Jul 29, 2023 | 1:52 PM
Share

मुंबई | 29 जुलै 2023 : ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा झटका बसला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. त्यावर स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उत्तर दिलं आहे. एकएकाला काय फोडता. हिंमत असेल तर निवडणुका घ्याच, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शेंडे यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला आले. यावेळी उद्घव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हानच दिलं. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. एक लक्षात येतंय उलटं लक्षात येतंय, कोणी गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येतं.

मग ते रागाचं आहे, द्वेषाचं आहे, जिद्दीचं आहे आणि जिंकण्याची इर्षाही आपली आणखी वाढतेय. त्यामुळे जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला. फक्त त्यांनी गेल्यानंतर पक्षाशी गद्दारी करू नये आणि पक्षाच्या विरुद्ध काम करू नये. नाही तर आपल्याला शिवसैनिक म्हणून त्यांना दाखवावे लागेल. कोणत्याही परिस्थिती आपले बालेकिल्ले राखले पाहिजे. त्यासाठी तुम्ही समर्थ आहातच, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांनाच धक्का बसेल

कोणी गेला शिवसेनेतून फुटला तर शिवसेनेला धक्का असं म्हटलं जातं. धक्का म्हणजे? उलट आपल्यात जे भरतीचं उधाण येतंय त्याने या लोकांना धक्का बसेल. एवढं होऊनही शिवसेना संपत नाहीये, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. शिवसेना संपत का नाही? उद्धव ठाकरे का संपत नाही? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांना धडकी भरली आहे. तुमची धडकी त्यांना भरली आहे. एक एक फोडण्यापेक्षा घ्या ना निवडणुका. एकदाच घ्या निवडणुका, असं आव्हानच ठाकरे यांनी दिलं.

अजीर्ण झालं, सोडून गेले

तुम्ही काळजी करू नका. जोरात काम करा. मी लवकरच तुम्हाला काही कार्यक्रम देणार आहे. आपण जिंकायचंच. गद्दारांना गाडायचंच हे सर्व जण बोलत आहे. मला एका गोष्टीचा अभिमान आहे. 2007ची निवडणूक असेल. तेव्हा शिवसेनेचं काय होणार असं वातावरण होतं. महापालिकेत शिवसेना जिंकणार की नाही असं म्हटलं जात होतं. तेव्हा आपण जिंकलो. तेव्हा अशीच गर्दी जमली होती. महिला होत्या. त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. या अश्रूचे मोल ज्यांना कळतं तोच निष्ठावान असतो. तुमच्या अश्रू आणि मेहनतीने ज्यांना ज्यांना मोठं केलं. त्यांना अजीर्ण झालं ते सोडून गेले, अशी टीका त्यांनी केली.

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.