सर्वात मोठी बातमी ! ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगात जाणार; आमदार संजय शिरसाट यांनी बॉम्बच टाकला

संजय राऊत फक्त बडबड करतात. त्यांना कुठे काय बोलावं हे कळत नाही. हेलिकॉप्टर नाही उडणं, जेवण डिप्लोमसी यावर त्यांची बेताल बडबड सुरू आहे.

सर्वात मोठी बातमी ! ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगात जाणार; आमदार संजय शिरसाट यांनी बॉम्बच टाकला
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 12:37 PM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाचे पाय आणखी खोलात जाणार असं चित्र दिसत आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या पाच खासदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. या पाचही खासदारांनी व्हीप पाळला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. शेवाळे यांच्या या विधानानंतर ठाकरे गटात खळबळ उडालेली असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. शिरसाट यांनी थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संजय शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते. कोव्हिड घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतला. मला धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचं सुजीत पाटकर यांनी म्हटलं आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मोठे बॉम्बच टाकले. तुम्हाला उगाच चौकशीसाठी बोलावलं का? उगाच कस्टडीत घेतलं का? मारून आरोप सिद्ध करता येत नाही. तुमच्याकडे कागदपत्र असेल गुन्ह्यात अडकला असेल तरच शिक्षा होते, असं संजय शिरसाट म्हणाले.

हे सुद्धा वाचा

खून केला तरी कोर्ट सोडतं

तुम्ही खून जरी केला असेल पण पुरावे नसतील तर कोर्ट सोडतं ना? पुरावा असेल तर तुम्हाला कुठेही माफी मिळत नाही. त्यामुळे याचिका दाखल करून होत नाही. त्यांना मदत करणारे जे कोणी असेल त्यांना सांगतो. आता वेळ तुमची येणार आहे. तुम्हाला तुरुंगात जावंच लागणार आहे, असा इशारा शिरसाट यांनी दिला.

राऊत, परब आत जाणार

कोण तुरुंगात जाणार असं शिरसाट यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी थेट नावच घेऊन खळबळ उडवून दिली. यात सर्वच आहेत. संजय राऊत असेल अनिल परब असेल ठाकरे कुटुंबातील कोणी असेल ते आत जाणारच ना? असा दावाच शिरसाट यांनी केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पंगतीची गरज नाही

संजय राऊत फक्त बडबड करतात. त्यांना कुठे काय बोलावं हे कळत नाही. हेलिकॉप्टर नाही उडणं, जेवण डिप्लोमसी यावर त्यांची बेताल बडबड सुरू आहे. अडीच वर्ष ज्या मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसता आलं नाही त्यांच्या लोकांना हे बोलावं? तुम्हाला सत्तेच्या खुर्चीत बसता आलं नाही हा तुमचा पायगुण होता. एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला जेवणाची पंगत ठेवण्याची गरज नाही. शिंदे कधीच एकटे जेवत नाहीत. त्यांच्यासोबत रोज चार पाच आमदार असतात, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.