महाआघाडीचं सरकार लवकरच पडणार हे शरद पवारही जाणून: निलेश राणे
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून भाजपवर घणाघाती हल्ला चढवला होता. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी पलटवार केला आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून जेवढे दिवस मिळालेत तेवढे आनंदाने घालवावेत. उगाच अंगावर येण्याची भाषा करू नये. हे सरकार लवकर कोसळणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा हे सरकार लवकर कोसळणार असल्याचं जाणून आहेत, असा दावा भाजप नेते निलेश राणे यांनी केला. (uddhav Thackeray Govt Will Collapse soon says nilesh rane)
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून भाजपवर घणाघाती हल्ला चढवला होता. त्यावर पलटवार करताना निलेश राणे यांनी हा दावा केला आहे. उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे. तरीही त्यांना साधं दुकानही चालवता येत नाही. त्यांनी अंगावर… छाताडावर येण्याची वार्ता करू नये. जेवढे दिवस मुख्यमंत्री म्हणून मिळालेत, ते दिवस घालवावेत. हे सरकार स्वत:हून कोसळणार आहे. आम्हाला पाडण्याची गरज नाही. सरकार पडणार हे शरद पवारांनाही माहीत आहे, असं निलेश राणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी काल जी भाषा वापरली ती अत्यंत चुकीची आहे. एवढाच सामना करायचा असेल तर एकदा होऊन जाऊ द्या. वेळ आणि ठिकाण सांगा आम्ही येऊ. मग समजेल. कलानगरमध्ये काय चालतं ते सर्व बाहेर काढू, हे सर्व किस्से ऐकण्यासाठी महाराष्ट्र कान टवकारून बसला आहे, असं सांगतानाच आम्हाला अंगावर येण्याची गरज नाही. तसंही मी रोजच अंगावर जातो, असंही ते म्हणाले. एका केंद्रीय मंत्र्यांबद्दल खालच्या थराला जाऊन बोलणं योग्य नाही. हे मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. तुम्ही दुसऱ्यांचे बाप काढाल तर आम्हीही तुमचे बाप काढू. दुश्मन कितीही मोठा असला तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही. आता ज्या भाषेत बोलतील, त्याच भाषेत उत्तर देऊ, तुम्हाला ही धमकी वाटत असेल तर वाटू द्या. उद्धव ठाकरेंना एकेरी उल्लेख करण्याचं लायसन्स मिळलाले आहे काय?, असा सवालही त्यांनी केला.
दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलंय सर्वांना माहीत
दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बलात्कार कुणी केला आणि हत्या कुणी केली हे सांगण्याची गरज नाही. हा तपास बाहेर आला तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल. मात्र, सत्य बाहेर येऊ नये यासाठी पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, असं ते म्हणाले.
सुशांतप्रकरणीही निलेश यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. सुशांतसिंह राजपूतची बॉडी एम्सकडे नव्हती. त्यामुळे एम्सलाही मर्यादा पडल्या. या प्रकरणात जे डमी पुरावे दिले गेले त्यानुसारच तपास झाला, असं सांगतानाच पोलीस दलातील काही अधिकारी दबावाखाली काम करत असतील. पुराव्याची अफरातफर करत असतील. म्हणूनच तपास चुकीचा झाला. त्यामुळे सीबीआयने खोलात जाऊन तपास करावा. पुरावे कुणी नष्ट केले, याचा अहवाल सीबीआयने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. (uddhav Thackeray Govt Will Collapse soon says nilesh rane)
Sanjay Raut | इतिहास त्यांनी जरा चाळून पहावा , भाजप नेत्यांवर संजय राऊतांची टीकाhttps://t.co/VpuOcBYDBY@rautsanjay61
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2020
संबंधित बातम्या:
दिशा सालियन प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल, निलेश राणेंचा दावा
उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता; राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
(uddhav Thackeray Govt Will Collapse soon says nilesh rane)