AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देशात सुडाचं राजकारण वाढतंय, मग देशाला भविष्य काय?’, के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिलंय.

'देशात सुडाचं राजकारण वाढतंय, मग देशाला भविष्य काय?', के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सवाल
के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 5:02 PM
Share

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. मागील काही दिवसांपासून या भेटीची चर्चा सुरु होती. या बैठकीला राव यांच्यासोबत काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही (Prakash Raj) उपस्थित होते. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे देखील या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीनंतर के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिलंय.

सुडाचं राजकारण ही हिंदुत्वाची संस्कृती नाही- ठाकरे

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशा बातम्या येत होत्या याची आपल्याला कल्पना आहे. त्याचा योग आज आला. कालच शिवरायांची जयंती होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते. आम्ही या भेटीतील काही लपवलं नाही. देशात जे गढूळ वातावरण बनत आहे. सूडाचं राजकारण वाढत आहे. ही आपल्या देशाची हिंदुत्वाची संस्कृती नाही. हे असंच सुरु राहिलं तर देशाला भविष्य काय? याचा विचार कुणीतरी करायला हवा होता. त्याची सुरुवात आज आम्ही केलीय. संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगना सख्खे शेजारी आहेत. राज्या राज्यात एक आपुलकीचं नातं राहिलं पाहिजे. नवी सुरुवात आज झालीय. त्याला आकार येण्यास वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत. देशातील मुलभूत प्रश्न सोडून इतर विषयांत हात घालण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत. पुढे जे काही ठरेल त्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार – केसीआर

उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद वाटला. ठाकरे आणि आमचं अनेक विषयांवर एकमत झालं आहे. देशातील राजकीय परिवर्तनावर आमच्यात चर्चा झाली. बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याचबरोबर ‘मी साफ करतो की आज एक सुरुवात झाली आहे. आम्ही सर्व सांगितलं आहे. आम्ही देशातील दुसऱ्या नेत्यांशी चर्चा करु. काय अपेक्षित आहे, काय करायला हवं यावर चर्चा होईल आणि तुम्हाला आम्ही त्याबाबत सर्व माहिती देऊ’, असंही राव यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

Video | माजी क्रीडा राज्यमंत्री कबड्डीच्या मैदानात, संजय देशमुखांनी थोपटल्या मांड्या, यवतमाळात खेळाडूंनी कसे केले बाद?

गिरीश महाजन यांना राजकारणात मी जन्माला घातलं, मात्र बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही-एकनाथ खडसे

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.