उद्धव ठाकरे यांनी घेतली अजितदादा यांची भेट; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भेटीगाठीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

5 मिनिटं दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. शरद पवारांच्या भूमिकेवर दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची माहीती सूत्रांनी दिली. सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी ही भेट घेतल्याची राजकिय जाणकारांमध्ये चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांनी घेतली अजितदादा यांची भेट; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भेटीगाठीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 2:52 PM

मुंबई : राज्य पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांचा विषय अधिवेशनात गाजला. कालच देशातील प्रमुख विरोधी पक्षांची आणि सत्ताधारी पक्षांची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक होती. त्या बैठकीची आजच्या अधिवेशनाला किनार होती. कालच्या बैठकीत काय झालं याची आमदार वरिष्ठ नेत्यांकडे चौकशी करत होते. मात्र, यावेळी आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं. ते म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उचांवल्या.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अन्य शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना भला मोठा गुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना स्वत: बसायला खुर्ची दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली.

हे सुद्धा वाचा

संभ्रमासाठी भेट?

या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. अजित पवार यांना भेटलो. चांगलं काम करा म्हणालो. मूळ विषयाकडे दुर्लक्ष करू नका असं अजित पवार यांना बोललो. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांच्याकडे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 5 मिनिटं दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. शरद पवारांच्या भूमिकेवर दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याची माहीती सूत्रांनी दिली. सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी ही भेट घेतल्याची राजकिय जाणकारांमध्ये चर्चा आहे.

हुकूमशाहीविरोधात लढाई

यावेळी त्यांनी बंगळुरू येथील बैठकीचा तपशील दिला. काल बंगळुरूमध्ये देशप्रेमी लोकांची बैठक झाली. आमची नवी आघाडी निर्माण झाली आहे. त्याचं नाव इंडिया आहे. ही लढाई व्यक्ती विरोधात नाही. हुकूमशाही विरोधात आहे, असं ते म्हणाले.

महिलांनी उत्तर दिलं

यावेळी उद्धव ठाकरे यांना किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडीओबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी राज्यातील महिलांनी त्या व्हिडिओबाबतचं उत्तर दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. या मुद्द्यावर त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.