Sanjay Jadhav | राष्ट्रवादीला पायाखाली घालायची भाषा करणारे खासदार संजय जाधव शिंदेंच्या संपर्कात? वाचा परभणीतल्या अनोख्या संघर्षाची काहणी! 

संजय जाधव देखील लवकरच शिवसेनेला राम राम करतील अशी चिन्हे आहेत, कारण परभणी जिल्हातील राष्ट्रवादी विरूध्द संजय जाधव हा संघर्ष महाराष्ट्राने बघितलायं. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणी जिल्ह्यात संजय जाधव यांचा चांगलाच दबदबा आहे. मात्र, असे असताना देखील राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून परभणी जिल्हात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार अनेक वेळा संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्याकडे केलीयं. 

Sanjay Jadhav | राष्ट्रवादीला पायाखाली घालायची भाषा करणारे खासदार संजय जाधव शिंदेंच्या संपर्कात? वाचा परभणीतल्या अनोख्या संघर्षाची काहणी! 
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 4:16 PM

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग आलायं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोरांना चर्चेसाठी समोर येण्याचं आवाहन केलं. इतकेच नाही तर नुकताच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेतही बंडखोरांना दिले आणि 24 तासांत मुंबईत येण्याचे भाविक आवाहन देखील केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 42 आमदार आहेत, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याचपार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात राज्यातील 10 खासदार असल्याचे देखील सांगितले जातेयं. या खासदारांमध्ये परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) यांचे नाव असल्याची चर्चा जिल्हात जोरदार रंगत आहे.

जिल्हात शिवसेनेच्या कार्यककर्त्यांवर अन्याय

संजय जाधव देखील लवकरच शिवसेनेला राम राम करतील अशी चिन्हे आहेत, कारण परभणी जिल्हातील राष्ट्रवादी विरूध्द संजय जाधव हा संघर्ष महाराष्ट्राने बघितलायं. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणी जिल्ह्यात संजय जाधव यांचा चांगलाच दबदबा आहे. मात्र, असे असताना देखील राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून परभणी जिल्हात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार अनेक वेळा संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्याकडे केलीयं.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा जाधवांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपली गळचेपी होत असल्याचा आरोप संजय जाधव यांनी अनेक वेळा केला. याच रागातून गेल्याच वर्षीच संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसतानाही जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले गेले असे म्हणत राजीनाम्याचे शस्त्र जाधव यांनी काढले होते.

विजय भांबळे आणि संजय जाधव वाद

संजय जाधव यांनी 2014 मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत जाधव यांना 5 लाख 78 हजार 455 मते मिळाली होती. मात्र, त्यानंतर संजय जाधव विरूध्द विजय भांबळे हा संघर्ष जिल्हामध्ये बघायला मिळाला. विजय भांबळे आणि संजय जाधव आजही एकमेंकांचे कट्टर विरोधकच आहेत. 2019 च्या निवडणुकीत संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांना धूळ चारली होती. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय जाधव यांच्यामध्ये मोठा वाद आहे.

भर कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीला बुडवायची भाषा जाधव यांनी केली होती

संजय जाधव यांनी शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात नगरपरिषेदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कट्टर शिवसैनिक असलेले संजय जाधव यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना देखील अनेक वेळा राष्ट्रवादीवर थेट टिका केलीयं. खासदार संजय जाधव यांनी जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना म्हटंले होते की, माकडीण सुध्दा गरज पडल्यावर पिल्लाला बुडवते. आम्ही पण राष्ट्रवादीला बुडवू. आता पाणी वर जात आहे, असा इशाराही जाधव यांनी दिला होता. मात्र, आज दुपारी शिवसेनेकडून मुंबईत बैठक घेण्यात आली होती, त्यावेळी खासदार संजय जाधव उपस्थित होते.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.