माझ्या नेतृत्वाखालील सरकार खेकड्यांनी फोडलं; उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

चोरवाटेने किंवा चोरून मारून हे उपदव्याप करावेच लागले नसते. ज्यांना मुख्यमंत्री होता आले असते त्यांना दुसऱ्यांना कुणाला तरी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावे लागत आहे. उपमुख्यमंत्रीपद वाट्याला येऊनही त्यांना पार्टनर घ्यावा लागतोय.

माझ्या नेतृत्वाखालील सरकार खेकड्यांनी फोडलं; उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 7:14 AM

मुंबई | 26 जुलै 2023 : गेल्यावर्षी मुसळधार पावसात माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. खेकड्यांनी धरण फोडलं. ते धरणातच बसले होते. मातीमध्ये… शेवटी खेकडा हा खेकडाच असतो. त्याला कितीही सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तरी तोतिरकाच चालतो, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. खेकड्यांनीच आपलं सरकार फोडलं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’ला परखड मुलाखत दिली आहे. खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील आणि देशाच्या राजकारणावर भाष्य केलं. इंडिया आघाडीवर आपली भूमिका मांडली. तसेच इर्शाळगड दुर्घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. याच मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. खेकड्यांची एक मानसिकता असते. ज्या टोपलीत खेडके असतात त्या टोपलीवर झाकण ठेवण्याची गरज नसते. एखादा खेकडा वर जायला गेला की बाकीचे त्याला खाली खेचतात. तसेच हेही खेकडेच आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

तर पार्टनर सोबत घ्यावा लागला नसता

यावेळी त्यांनी अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावरूनही भाजपवर हल्ला चढवला. 2019 मध्ये अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता. तो पाळला असता तर आधी शिवसेना किंवा भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. नंतरच्या अडीच वर्षात ज्यांचा काळ उरला त्यांचा मुख्यमंत्री झाला असता. दिमाखाने मुख्यमंत्रीपदावर बसला असता.

चोरवाटेने किंवा चोरून मारून हे उपदव्याप करावेच लागले नसते. ज्यांना मुख्यमंत्री होता आले असते त्यांना दुसऱ्यांना कुणाला तरी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावे लागत आहे. उपमुख्यमंत्रीपद वाट्याला येऊनही त्यांना पार्टनर घ्यावा लागतोय. ही अशी वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.

फक्त गद्दार उरलेत

एनडीएच्या बैठकीवरही त्यांनी सडकून टीका केली. गेल्या आठवड्यात एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं. आपली इंडिया नावाची आघाडी तयार झाली आहे. आपल्या आघाडीला उत्तर देण्यासाठी मोदींनी एनडीएची जेवणावळ घातली. 36 पक्षांना त्यांनी एकत्र केलं. खरं म्हणजे त्यांना एवढे पक्ष एकत्र आणण्याची गरज नव्हती.

ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीन पक्षच एनडीएत आहेत. तेच शिल्लक उरलेत, अशी टीका करतानाच एनडीएतील इतर पक्षांचा एकही खासदार नाही. खरी शिवसेना तरी कुठे एनडीएत आहे. तिथे फक्त गद्दार आहेत, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.