Uddhav Thackeray : संघाची विचारधारा घेऊन भाजप पुढे जातोय का?; उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट सवाल

Uddhav Thackeray : तुम्हाला आमची भूमिका पटली. आपली युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाली नाही. आम्ही सत्तेत असताना आला आहात. सत्ता तर येणार आहे. काही नसताना तुम्ही मोलाची साथ देत आहात. हे महत्त्वाचं आहे. काही नसताना जी वैचारिक युती झाली आहे, महाराष्ट्रात जे घडवलं ते बिघडवलं.

Uddhav Thackeray : संघाची विचारधारा घेऊन भाजप पुढे जातोय का?; उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट सवाल
संघाची विचारधारा घेऊन भाजप पुढे जातोय का?; उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 2:30 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर आज जोरदार टीका केली. गेली 25 ते 30 वर्ष आम्ही हिंदुत्वाच्या स्वप्नापायी भाजपसोबत युती केली होती. संघाची एक विचार धारा आहे. पण संघाची विचारधारा घेऊन भाजप (bjp) पुढे जातोय असं वाटतं का? मातृसंघटनेची विचारधाराच भाजप मानत नसेल तर माझ्या पेक्षा तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा. संघाची (rss) विचारसरणी त्यांना मान्य आहे का? भाजप तसं वागत आहे का? मोहन भागवतांनी दोन चार वर्षापासून जे मते मांडलीत त्यानुसार तुम्ही वागताय का? असे प्रश्न विचारून उद्धव ठाकरे यांनी भाजपला भंडावून सोडलं. तसेच संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना निवडणुकीतही आणि वैचारिक पातळीवरही विरोधकांशी खांद्याला खांदा लावून लढणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी आज केली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं, प्रादेशिक अस्मिता मारून टाकणं, इतर पक्ष संपवून टाकणं यालाच लोकशाही मानणारे काही लोकं आहेत. हे लोक बेताल बोलायला आणि वागायला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरू आहे. न्याय देवतेवर विश्वास आहे. निकाल लागणार आहे. तो केवळ शिवसेनेचं भवितव्य ठरवणारा नाही तर यापुढे देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील हे ठरवणार असणार आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.

प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र या

विचार मजबूत करायचे असेल तर केवळ वैचारिक युती असं नसतं. केवळ रस्त्यावर उतरायचं असं नाही. मला तगडा सहकारी मिळाला आहे. खांद्याला खांदा लावून निवडणुका लढत असेल तर का लढू नये? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय. संभाजी ब्रिगेडचं अभिनंदन करतोय. आपण जो विचार करून सोबत आला आहात. गेले दोन महिने अनेक जण आपल्या विचाराचे आणि शिवसेनेच्या विचाराचे नाहीत तेही जवळ येत आहे. संविधान वाचवण्यासाठी आणि प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू. दुहीचा शाप मोडून टाकू, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आमचं हिंदुत्व सोप्पं आहे

औरंगजेबाने सांगितलं होतं हे मराठे पराक्रमात यांना जगात तोड नाही. पण या भूमीत दुहीची बीजं खडकावर जरी फेकली तरी ती हा हा करून फोफावतात आणि वाढतात. हे आजपर्यंत आपल्या शत्रूलाही कळलं. पण आपल्याला कळलं नाही, असं म्हणणार नाही. पण कळलं तरी वळणार कसं? मला आनंद आहे. तुम्ही शिवसेनेसोबत आलात. पुरोगामी वगैरे शब्द कठिण आहे. पण आमचं सोप्पं आहे. हिंदुत्व सोप्पं आहे, असं त्यांनी सांगितलं.

वैचारिक युती झालीय

तुम्हाला आमची भूमिका पटली. आपली युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाली नाही. आम्ही सत्तेत असताना आला आहात. सत्ता तर येणार आहे. काही नसताना तुम्ही मोलाची साथ देत आहात. हे महत्त्वाचं आहे. काही नसताना जी वैचारिक युती झाली आहे, महाराष्ट्रात जे घडवलं ते बिघडवलं. ती महाराष्ट्राची ओळख नाहीये. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तसं वागत नाही. पण दाखले देताना महाराजांचे देतात. आणि भलतंच वागतात, असा टोला त्यांनी भाजपला नाव न घेता लगावला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.