Uddhav Thackeray | संजय राठोडांच्या शक्ती प्रदर्शनानंतर उद्धव ठाकरे लवकरच पोहरादेवीला जाणार, विदर्भ स्वारीसाठी शिवसेनेची तयारी

येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे हे पोहरादेवी इथं येणार असल्याची माहिती पिठाधीश संत बाबूसिंग महाराज आणि राजू नाईक यांनी दिली आहे.

Uddhav Thackeray | संजय राठोडांच्या शक्ती प्रदर्शनानंतर उद्धव ठाकरे लवकरच पोहरादेवीला जाणार, विदर्भ स्वारीसाठी शिवसेनेची तयारी
शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वाशिम दौरा Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 4:28 PM

वाशिमः शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि नव्या सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी नुकताच बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (Pohradevi) येथे जोरदार शक्ति प्रदर्शन केलं. राज्याच्या काना कोपऱ्यातून जवळपास 20 हजार बंजारा समाज बांधव पोहरादेवीत दाखल झाले होते. यानंतर आता खुद्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेदेखील पोहरादेवीच्या दर्शनासाठी लवकरच येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं होतं. येथील धर्मगुरुंच्या आशीर्वादानेच त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं होतं, असं वक्तव्य पोहरादेवीच्या पीठाधीशांनी केलं. उद्धव ठाकरे यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील काही शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी पोहरादेवी येथे भेट दिली. तसेच शिवसेना प्रमुखांच्या विदर्भ दौऱ्यासाठी चाचपणी केली. येत्या काही दिवसात उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरु होणार असून त्याची सुरुवात पोहरागड येथूनच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर लवकरच पोहरागड येथे मूळ शिवसेनेचंही शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

पोहरादेवीत शिवसैनिकांची चाचपणी

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या काही दिवसात बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं येणार आहेत. जगदंबा देवी, संत सेवालाल महाराज, धर्मगुरू संत रामरावजी महाराज, पिठाधीश संत बाबूसिंग महाराज यांचं दर्शन घेऊन विदर्भाच्या शिवसेना प्रचार व प्रसाराची सुरवात करणार आहेत. त्यासाठी आज मुंबई येथील बंजारा नेते शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू नाईक, उद्योगपती विशाल जाधव, गोंदिया विधानसभा संपर्क प्रमुख भोला महाराज राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी पोहरादेवी इथं आले. येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे हे पोहरादेवी इथं येणार असल्याची माहिती पिठाधीश संत बाबूसिंग महाराज आणि राजू नाईक यांनी दिली आहे.

पोहरादेवीचा आशीर्वाद कामी येणार का?

पोहरागड येथील पीठाधीश संत बाबूसिंग महाराज म्हणाले, ‘ पोहरागड ही बंजारा समाजाची काशी आहे. यापूर्वी एकदा 3 डिसेंबरला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दर्शनासाठी आले होते. येथील धर्मगुरूंनी त्यांना खूप आशीर्वाद दिले होते. त्यामुळे त्यांना चांगलं झालं. ते पुन्हा एकदा दर्शनासाठी येणार आहेत. राजू नाईक, विशाल चव्हाण आदी आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची तारीख कळाली नसली तरीही यावेळीदेखील त्यांनी येथील धर्मगुरुंचे आशीर्वाद घ्यावेत, असं वक्तव्य संत बाबूसिंग महाराज यांनी केलंय.

संजय राठोडांचं शक्तिप्रदर्शन

विदर्भातील बंजारा समाजाचे नेते म्हणून शिवसेना आमदार संजय राठोडांची ख्याती आहे. मात्र बीड येथील पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी दोषी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संजय राठोडांना पोलिसांकडून क्लिनचिट देण्यात आली. एकनाथ शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही देण्यात आलं. मात्र तरुणीच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्यांना मंत्रिमंडळात कसे स्थान दिले जाते, यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बंजारा समाजाचा प्रभावी नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला जवळपास 20 हजार बंजारा बांधव जमले होते. माझ्यावरील आरोपांना मी कायदेशीर मार्गाने उत्तर देईल, असे यावेळी त्यांनी म्हटले. राठोड यांच्या दौऱ्यानंतर आता राज्याचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या आगामी दौऱ्याकडे लागले आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.