Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस 14 महिन्यांपूर्वी सोडली, पण राजकारण नाही, जमिनीवर उतरुन तळागळात पोहोचायचंय : उर्मिला मातोंडकर

"चित्रपटसृष्टीत असताना लोकांनीच मला स्टार केलं. त्यानुसार मी माझ्या राजकीय आणि उर्वरित आयुष्यात लोकांनी बनवलेली लिडर होणं पसंत करेल", अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर यांनी दिली (Urmila Matondkar said I left congress from 14 month ago).

काँग्रेस 14 महिन्यांपूर्वी सोडली, पण राजकारण नाही, जमिनीवर उतरुन तळागळात पोहोचायचंय : उर्मिला मातोंडकर
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 5:43 PM

मुंबई : “मी काँग्रेस पक्ष सोडून 14 महिने झाले आहेत. मी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडली तेव्हा पक्ष सोडत आहे पण लोकांकरीता काम करत राहील असं म्हटलं होतं. मी तेव्हा राजकारण सोडलं नव्हतं. आताही माझ्यात जितकी क्षमता आहे त्या क्षमतेने जमिनीवर उतरुन काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण एसी रुममध्ये बसून या गोष्टी होतील असं वाटत नाही. आज मी लोकांकडून थोडा वेळ मागत आहे. मला थोडा वेळ द्या”, अशी विनंती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी जनतेला केली. शिवसेना प्रवेशानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या (Urmila Matondkar said I left congress from 14 month ago).

“जेव्हा मी चित्रपटसृष्टीत 29-30 वर्षांपूर्वी माझी कारकिर्द सुरु केली तेव्हा मी अत्यंत साध्यासुध्या मराठमोळ्या घरातून आलेली मुलगी होती. आईला मेकअपबाबत काहीही कल्पना नव्हती. पण लोकांची साथ होती. आज मी माझ्या राजकीय वाटचालीत नवं पाऊल उचललं आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की, ही एक अजून एक अवघड वाट आहे. यासाठी लोकांचा पाठिंबा गरजेचा आहे. चित्रपटसृष्टीत असताना लोकांनीच मला स्टार केलं. त्यानुसार मी माझ्या राजकीय आणि उर्वरित आयुष्यात लोकांनी बनवलेली लिडर होणं पसंत करेल”, असं उर्मिला म्हणाल्या.

“मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करायला आलेली आहे. महाविकास आघाडी सरकारने खरंच वाखणण्याजोगे कामगिरी केलं आहे. गेल्या दहा महिन्यात महाराष्ट्र अतिशय कठीण काळातून जात होता. कोरोना संकट, अतिवृष्टी, चक्रीवादळ या सरख्या संकटांना महाराष्ट्राने तोंड दिलं. या काळात सरकारने वाखणण्याजोगं काम केलं आहे”, अशा शब्दात उर्मिला यांनी राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं.

“शिवसेनेची महिला आघाडी खूप भक्कम आहे. मला शिवसेनेचा भाग झाल्याचा आनंद आहे. मुंबईत महाराष्ट्र आणि जगभरातून असंख्य मुली येतात. त्यांचे आई-वडील अत्यंत आत्मविश्वासाने पाठवतात की, आमच्या मुली मुंबईत सुखरुप आहेत. मला अत्यंत आनंद आणि अभिमान हे की त्या मुंबई शहराचा मी भाग आहे. महिला सुरक्षेबाबतचे अनेक समस्या आहेत. त्यासाठी मला काम करायचे आहे”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या (Urmila Matondkar said I left congress from 14 month ago).

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सांभाळला, कोरोना काळात ते कुटुंबप्रमुख बनले : उर्मिला मातोंडकर

होय, मी काँग्रेसची विधानपरिषदेची ऑफर नाकारली; शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांचा खुलासा

राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...