उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘सोनिया गांधी आणि राहुल गांधींविषयी आदर, पण…. ‘

उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी (1 डिसेंबर) शिवसेनेत प्रवेश केला. या निमित्ताने त्यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अत्यंत मार्मिकपणे आपलं मत मांडलं.

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, 'सोनिया गांधी आणि राहुल गांधींविषयी आदर, पण.... '
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 11:38 PM

मुंबई : “काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच माझे काही मतभेद झाल्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आजही आदर आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याबद्दलही माझ्या मनात अतिशय आदर आहे. त्यामुळे कोणता पक्ष सरस असा विचार करणं चुकीचं आहे”, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी दिली. उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी (1 डिसेंबर) शिवसेनेत प्रवेश केला. या निमित्ताने त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अत्यंत मार्मिकपणे आपलं मत मांडलं (Urmila Matondkar said I respect Sonia Gandhi and Rahul Gandhi).

शिवसेनेत प्रवेश का केला?

“काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष आहेत. यामध्ये गांधी किंवा ठाकरे घराण्याचा प्रश्न नाही. शिवसेना आज ज्याप्रकारे काम करतेय ते समजून घेणं आज जास्त गरजेचं आहे. ते उत्तम प्रकारे काम करत आहेत. सरकारने कोरोना संकटात केलेलं काम वाखणण्याजोगं आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ, चक्रीवादळ बघावा लागला. या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेत सर्व प्रकारच्या लोकांना बरोबर घेऊन शिवसेना पुढे चालली आहे”, असं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं.

“काँग्रेसला वर्षभरापूर्वीच रामराम ठोकला होता. त्यामुळे शिवसेना प्रवेशाचा आणि काँग्रेस सोडल्याचा काहीच संबंध नाही. वर्षभराच्या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठीण काळात ज्याप्रकारे पुढे नेलं ते वाखणण्याजोगं आहे. मी जेव्हा राजकारण्यात आली तेव्हा मला लोकांकरिता काम करायचं होतं. गोरगरिब जनतेकरिता ज्यांच्याकडे सुखसुविधा उपलब्ध नाहीत त्यांच्याकरता मी राजकारणात आली. यासाठी मी माझं सोयीस्कर आयुष्य बाजूला ठेवून राजकारणात आलं. शिवसेनेत मला चांगलं काम करण्याची संधी मिळेल, यासाठी मी राजकारणात आली”, अशी भूमिका उर्मिला यांनी मांडली.

‘लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक पक्षांनी निमंत्रण दिलं’

“लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक पक्षांनी पक्षप्रवेशासाठी निमंत्रण दिलं. मात्र, निमंत्रण कुणी दिलं ते असं खुलेआमपणे सांगणं मला चुकीचं वाटतं. सुज्ञास अति सांगणं न लगे. त्यामुळे लोकांना ते कळेलच. तमाम पक्षांनी मला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देऊन पक्षामध्ये बोलावलं. त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. पण ऑफर दिली म्हणून मी पक्षात जाऊ शकत नाही. आपण जेव्हा एखाद्या पक्षात प्रवेश करतो तेव्हा त्या पक्षासोबत आपली वैचारिक बांधिलकी असावी लागते. कार्यप्रणाली आवडायला हवी. ते जेव्हा आपल्याला वाटते तेव्हाच आपण पक्षात प्रवेश करतो. त्यामुळे मी आज शिवसेनेत प्रवेश केला”, असं उर्मिला म्हणाल्या.

‘मी फक्त जन्माने नाही तर कर्माने सुद्धा हिंदू’

“धर्माबाबत शाब्दिक खेळात लोकांना खेळवून ठेवलं जातं. धर्माबाबतच्या व्याख्याच मला चुकीच्या वाटतात. हिंदू धर्म इतका महान आणि मोठा आहे, तो धर्म आपल्याला सहिष्णुता, सर्वसमावेशकता, वसुधैव कुटुंबकम म्हणजे सर्व एकच आहेत, या हिंदू धर्माला तुम्ही कसं सांगाल की हिंदू धर्म कसा. मी लोकसभा निवडणुकीतबी बोलले होते की, मी धर्माने हिंदू आहे, मी हिंदूच राहील. त्यासाठी मला रस्त्यात आरडाओरड करुन सांगण्याची आवश्यकता नाही. मला माझ्या धर्माने ही मुभा दिली आहे की, तो मी कसा पाळायचा. मी माझ्याप्रमाणे उत्तमरित्या पाळते. मी फक्त जन्माने नाही तर कर्माने सुद्धा हिंदू आहे”, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

कुठे काम करायला आवडेल?

“जिथे लोकांना माझी गरज आहे, जिथे लोकांना हवा तितका न्याय मिळत नाही तिथे मला काम करायला आवडेल. मला गोडगरिबांमध्ये काम करायला आवडेल. जर मला लोकसभेच्या निवडणुकांनंतर फिरताना पाहिलं तर मी झोपडपट्टी आणि गरिब लोकांमध्ये हिंडली आहे. काम करण्याकरतो जर आलोय तर घरात बसून काम करु शकत नाही. गेल्यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील महापुरावेळी तीन दिवसाच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी मी माझ्यापरिने होईल तितकी मदत केली होती. मी त्यावेळी सांगली, सातारा कोल्हापूर, इचलकरंजी फिरली होती. आता एक शिवसैनिक म्हणून इतर शिवसैनिकसारखं काम करायला आवडेल”, असं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं (Urmila Matondkar said I respect Sonia Gandhi and Rahul Gandhi).

 

संबंधित बातम्या :

काँग्रेस 14 महिन्यांपूर्वी सोडली, पण राजकारण नाही, जमिनीवर उतरुन तळागळात पोहोचायचंय : उर्मिला मातोंडकर

होय, मी काँग्रेसची विधानपरिषदेची ऑफर नाकारली; शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांचा खुलासा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.