Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशात भाजपाला गळती सुरूच; आणखी तीन आमदारांचे राजीनामे, सपाकडून भाजपाला कुलूपाची भेट

उत्तर प्रदेश विधनसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखेची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर मंगळवारी भाजपाच्या आणखी तीन आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपाला गळती सुरूच; आणखी तीन आमदारांचे राजीनामे, सपाकडून भाजपाला कुलूपाची भेट
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 5:20 PM

लखनऊ : उत्तर प्रदेश विधनसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखेची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. योगी सरकारमध्ये कॅबेनेट मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर मंगळवारी भाजपाच्या आणखी तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये तिंदवारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार ब्रजेश प्रजापती, तिलहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रेशनलाल वर्मा आणि बिल्हौर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भगवती सागर यांचा समावेश आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार या तीनही आमदारांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थनार्थ पक्षाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. हा भाजपसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बसलेला मोठा धक्का मानण्यात येत आहे.

…म्हणून दिला राजीनामा

योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजापाला सोड चिठ्ठी देत सपामध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांच्या समर्थनार्थ राजीनामा देणारे आमदार ब्रजेश प्रजापती, रोशनलाला वर्मा आणि भगवती सागर हे देखील सपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राजीनामा देताना आमदार रेशन लाल यांनी म्हटले आहे की, मी गेल्या पाच वर्षांपासून भाजपाचा आमदार आहे. मात्र मी माझ्या मतदारसंघातील विविध समस्या राज्य सरकारसमोर मांडल्या परंतु त्या सोडवण्यासाठी कुठलेच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर बोलताना उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे की, घाईने घेतलेला कुठलाही निर्णय हा चुकीचा ठरतो, स्वामी प्रसाद मौर्य यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे मला माहित नाही. मात्र त्यांनी खूप घाईत निर्णय घेतला आहे.

नेत्यांच्या मनधरणीची जाबाबदारी प्रदेशाध्यक्षांवर

उत्तर प्रदेश विधनसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र दुसरीकडे पक्षावर नाराज असल्याने अनेक जण भाजपाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपावर नाराज असलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी भाजपाने प्रदेश संगठन मंत्री सुनील बंसल आणि प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्यावर सोपावली आहे. बंसल आणि स्वतंत्र देव सिंह हे नाराज नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याचे दिसून येत आहे.

सपाकडून भजपाला कुलूप भेट

भाजपाला सोडचिठ्ठी देत अनेक जणांनी सपामध्ये प्रवेश केला आहे. यावरून समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री आयपी सिंह यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला आहे. सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ओमप्रकाश राजभर, जयंत चौधरी, राजमाता कृष्णा पटेल संजय चौहान आणि आता स्वामीप्रसाद मौर्य यांनी भाजपाची सात सोडत सपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मी आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना एक कुलूप भेट दिले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर स्वतंत्र देव सिंह हेच कुलूप भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील मुख्यालयाला लावून घरी जाऊ शकतात.

संबंधित बातम्या

मोठी बातमी : पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला

कोरोना संकटातही आरोग्य खातं खणखणीत सांभाळणारे मंत्री! जालन्याचे आमदार राजेश टोपे यांच्या कारकीर्दीवर धावती नजर

Girish Mahajan : गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पुणे पोलिसांकडून जळगावातून टेम्पोभर कागदपत्र जप्त

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....