सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले, सुषमा अंधारे यांना मीच घडवलं

आज दुपारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे.

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले, सुषमा अंधारे यांना मीच घडवलं
सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रियाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 11:39 AM

ठाणे: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. वाघमारे यांचा प्रवेश ही शिंदे गटाची मोठी राजकीय खेळी असून सुषमा अंधारे यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. आजच त्यांचा प्रवेश होणार आहे. मात्र, या प्रवेशापूर्वी त्यांनी टीव्ही9 मराठीवर एक्सक्ल्युझिव्ह संवाद साधला. सुषमा अंधारे या मुलुख मैदानी तोफ नाहीत. त्यांना मीच घडवलं आहे, असा दावा वैजनात वाघमारे यांनी केला आहे.

वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारणही स्पष्ट केलं. आजचा आनंदाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. त्यामुळे मी त्यांच्या प्रेमात पडलो.

हे सुद्धा वाचा

त्यामुळेच मी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रवेश होत असल्याचं वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं.

सुषमा अंधारे यांच्यासोबत कोणतेही मतभेद नाहीत. ही विचाराची लढाई आहे. त्यांना ते विचार आवडले त्या तिकडे गेल्या. मला एकनाथ भाईंचे विचार आवडले. एकनाथ शिंदे यांचा विद्रोही. क्रांतिकारक स्वभाव आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे आलो आहे. ही विचाराची लढाई आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सुषमा अंधारे या मुलुख मैदानी तोफ आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, असं काही नाही. तोफ वगैरे काही नाही. त्यांना घडवणारा, वैचारिक दृष्टा परिपक्व करणारा मीच आहे. ते बघू नंतर. आज आपल्याला काम करायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. सुषमा अंधारे यांच्यापासून पाच सात वर्षापासून मी विभक्त राहतोय, असंही वाघमारे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आज दुपारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.