उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन, हितेंद्र ठाकूरांना भिडणाऱ्या बड्या नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी

शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थित विजय पाटलांनी पक्षप्रवेश केला. (Vasai Shivsena Vijay Patil Congress )

उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन, हितेंद्र ठाकूरांना भिडणाऱ्या बड्या नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी
वसईतील नेते विजय पाटील यांचा काँग्रेस प्रवेश
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 8:45 PM

वसई : महाविकास आघाडीतील नेत्याने एका पक्षातून दुसऱ्यात उडी मारण्याचं उदाहरण पुन्हा समोर आलं आहे. वसईतील नेते विजय पाटील (Vijay Patil) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) रामराम ठोकत पुन्हा काँग्रेसचा (Congress) झेंडा हाती धरला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या विरोधात विजय पाटील यांनी गेल्या वेळी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election 2019) लढवली होती. (Vasai Virar Shivsena Leader Vijay Patil joins Congress ahead of Municipal Election)

शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांच्या उपस्थित विजय पाटलांनी काल पक्ष प्रवेश केला. विजय पाटील यांची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. विजय पाटील यांनी याआधी काँग्रेसचे राज्य सचिवपद भूषवले आहे. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सप्टेंबर 2019 मध्ये पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन हाती बांधले होते.

हितेंद्र ठाकूर यांना आव्हान

विजय पाटील वसई विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यानुसार शिवसेनेच्या तिकीटावर वसईतून त्यांनी बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात शड्डूही ठोकला. मात्र त्यांना ठाकूर यांनी सहज पराभवाची धूळ चारली होती.

कोण आहेत विजय पाटील?

विजय पाटील हे वसईतील प्रभावी राजकीय नेते आहेत. आग्री, वाढवळ, ख्रिश्चन समुदायांचा त्यांच्या पाठीशी चांगला जनाधार असल्याचंही बोललं जातं. पाटील हे वसईतील उद्योजक आहेत. त्यांना स्वच्छ प्रतिमेचा राजकीय चेहरा असंही बोललं जातं.

वसई विरार महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर

विजय पाटील यांच्या घरवापसीने वसई विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे, तर काँग्रेसला बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. महापालिका निवडणुकांना दोन्ही पक्ष एकत्र सामोरे जाणार की स्वतंत्र, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. परंतु वसईत प्राबल्य असलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे विजय पाटील यांना मोठं पाठबळ आहे.

संबंधित बातम्या :

काँग्रेसचे राज्यसचिव विजय पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत

(Vasai Virar Shivsena Leader Vijay Patil joins Congress ahead of Municipal Election)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.