Video : ‘… आणि आमच्या छातीवर नाचतो’, तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीवर निशाणा; महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

'राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं', अशा शब्दात तानाजी सावंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

Video : '... आणि आमच्या छातीवर नाचतो', तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीवर निशाणा; महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर
तानाजी सावंत, आमदार, शिवसेनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 6:39 PM

सोलापूर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सत्तेला अडीच वर्षे लोटली. मात्र, महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं सातत्यानं पाहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा केला जातो. मात्र, तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदारांकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरुच आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी (Shivsena MLA) अनेकदा खासगीत आणि कही जाहीरपणेही निधीवाटपाबाबत खंत व्यक्त केली आहे. आताही शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सोलापुरात जाहीरपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर जोरदार निशाणाही साधलाय. ‘राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं’, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे महाविकास आघाडीत निधी वाटपावरुन मोठे मतभेद असल्याचंच पाहायला मिळत आहे.

‘आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय’

युवासेनेच्या मेळाव्यात तानाजी सांवत म्हणाले की, आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे, कुणाही आजमावून बघू नये. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते. अर्थसंकल्पातही तेच दिसून आलं. 60 ते 65 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30 ते 35 टक्के काँग्रेसला, त्यातही 16 ठक्के पगारासाठी काढावे लागतात. विकासकामाला केवळ 10 टक्के मिळतात. राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करु. आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर प्रचंड नाराजी आहे, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.

‘आमचा एकच बसला तर आईचं दूध आठवले’

तानाजी सावंत यांनी या कार्यक्रमात बोलताना मागील अडीच वर्षात शैवसैनिकांना फोडल्याचे दाखले दिले. तसंच ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी पाहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यांच्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असं ठरलेलं असताना असं का होतं? आमच्या नादी लागू नका, तुम्ही 100 मारले आणि आमचा एकच दणकट बसला तर आईचं दूध आठवेल, असा इशाराच तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिलाय. मागील अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल तर विचार करायला हवा. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही. सत्तेत आमच्यासोबत आहात तर आमच्यावर वार का करता? त्यांचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आम्हाला काय? शिवभोजन थाळी चालवा, महिन्याचे बिल येण्याची वाट पाहा. भाजपसोबत सत्तेत असतानाही हेच होत होतं आणि आताही तेच होतंय, अशा शब्दात सावंत यांनी आपली खंत व्यक्त केलीय.

इतर बातम्या : 

VIDEO: यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’चा उल्लेख, अजितदादा म्हणाले

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, संदीप क्षीरसागरांवर गंभीर आरोप

राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेच दिसलं, Pankaja Munde यांची टीका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.