AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan parishad : शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफुस? काय आहे कारण?

शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विधान परिषदेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परस्पर उमेदवार कसे जाहीर केले? असा प्रश्न विचारला. नाशिकची जागा शिंदे गटासाठी असल्याचे दादा भुसे यांचे म्हणणे होते.

Vidhan parishad : शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफुस? काय आहे कारण?
| Updated on: Jan 17, 2023 | 4:59 PM
Share

मुंबई : vidhan parishad election विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना शिंदे गट (shiv sena shinde gat) आणि भारतीय जनता पक्षात (bjp)धुसफुस सुरु झाली आहे. यासंदर्भातील विषय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. भाजपने परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. देवेन भारती यांच्या नियुक्तीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)नाराज असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ३० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे नाव होते. तर पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. नाशिक विधानपरिषद संदर्भात एक दोन दिवसांत होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिक आणि कोकण या दोन जागा शिंदे गटाला हव्या आहेत. परंतु भाजपने शिंदे गटाशी चर्चा न करता ही नावे निश्चित केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद :  शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विधान परिषदेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परस्पर उमेदवार कसे जाहीर केले? असा प्रश्न विचारला. नाशिकची जागा शिंदे गटासाठी असल्याचे दादा भुसे यांचे म्हणणे होते. तीन जागा भाजप आणि दोन शिंदे गट असे सूत्र ठरले असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांनी उमेदवार परस्पर जाहीर झाले नाही. यासंदर्भात निर्णय जाहीर केला तेव्हा उदय सामंत उपस्थित असल्याचे सांगून फडणवीस यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

देवेन भारती यांच्या निवडीवर नाराजी :  मुंबई पोलीस दलात देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आले. या निवडीवर पोलीस दलात नाराजी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा न करता परस्पर हा निर्णय जाहीर केल्याचे बोलले जात आहे. यामुळे या निवडीवर एकनाथ शिंदे नाराज आहेत.

कोण आहे ज्ञानेश्वर म्हात्रे :

कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजप प्रणीत शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या नावाबाबत चर्चा होती. आतापर्यंत ही निवडणूक भाजप ऐवजी शिक्षक परिषदच लढत होती. मात्र, यावेळी भाजपने बोरनारे यांचा पत्ता कट करून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आपली उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्याशी रंगणार आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाची २०१७ मधील निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांना ६ हजार ८८७ मते घेत ते दुसऱ्या स्थानी होते. बदलापूर येथील असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे बदलापुरातील शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक व मुख्याध्यापक आहेत. शिवसेनेची पार्श्वभूमी असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.