विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, मेटेंचा गंभीर आरोप; मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात, असा घणाघात मेटे यांनी केलाय. मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे, त्यामुळे तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केलीय.

विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, मेटेंचा गंभीर आरोप; मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
विनायक मेटे, विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 3:18 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मेटेंनी गंभीर आरोप केलाय. विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात, असा घणाघात मेटे यांनी केलाय. मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे, त्यामुळे तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केलीय. (Vinayak Mete alleges that Minister Vijay Vadettiwar is a racist man)

मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी आम्ही आज धरणे आंदोलन करुन सरकारला फक्त इशारा दिलाय. जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर 23 तारखेपासून अहमदनगरपासून आंदोलनाला सुरुवात करण्याचा इशाराही मेटेंनी राज्य सरकारला दिलाय. शिवस्मरकाचे काम अद्यापही सुरु झालेलं नाही. महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना स्मारकाचा विसर पडलाय, असा खोचक टोला मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लगावलाय. शिवस्मारकाचं कामही लवकरात लवकर सुरू व्हायला हवं, अशी मागणी मेटे यांनी केलीय.

‘छत्रपतींच्या स्मारकासाठी 2 वर्षात 2 मिनिटेही वेळ दिला नाही’

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतणा मावशीचे असल्याचा आरोप मेटे यांनी जळगावात केला होता.

अशोक चव्हाण यांना ‘विश्वासघातकी पुरस्कार’ दिला जाणार

राठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन 19 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला 24 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला. अशोक चव्हाण यांना विश्वासघातकी पुरस्कार दिला जाणार असल्याचा खोचक टोला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलाय. चव्हाण यांनी उपसमितीचे अध्यक्ष असूनही मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणीही मेटे यांनी पुन्हा एकदा केली.

102 व्या घटनादुरुस्तीबाबत जो कायदा करण्यात आला आहे, त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकार याबाबत काहीच पावलं उचलत नाही. बैठकीत उद्धव ठाकरे सरकारबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. तसंच अजित पवार यांच्या अभिनंदनाचाही ठरावं करण्यात आला. त्यांनी सारथी संस्थेबाबत उत्तम काम केल्याचं मेटे म्हणाले होते.

इतर बातम्या :

देशमुख तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचा हार टाकून स्वागत करायचं का? : चंद्रकांत पाटील

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे 2 डोस पूर्ण करा, उपमुख्यमंत्र्यांची सूचना

Vinayak Mete alleges that Minister Vijay Vadettiwar is a racist man

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.