AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत, सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का?; मेटेंचा सवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर आणि राज्यातील ओबीसी मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत, सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का?; मेटेंचा सवाल
| Updated on: Dec 13, 2020 | 2:59 PM
Share

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर आणि राज्यातील ओबीसी मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी कोणत्याही मराठा नेत्याने केलेली नाही. अशावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत आहेत. सरकारला मराठा समजााला आरक्षण द्यायचं नाही का? ओबीसींचे मोर्चे, आंदोलने सरकार पुरस्कृत आहेत का? तसेच सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे का? असा सवाल विनायक मेटे यांनी केला आहे. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नाहीत. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे उद्या काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.

मेटेंचे सवाल

मराठा समाजातील कोणत्याही नेत्याने ओबीसींमधून आरक्षण मागितलेलं नाही. पण ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्री आणि राज्यातील ओबीसी नेते मराठा आरक्षणावरून बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी मोर्चे, आंदोलनंही सुरू केली असून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी नेत्यांचे हे मोर्चे, मेळावे सरकार पुरस्कृत आहेत का? राज्यातील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत असून सरकारने त्यांच्यावर कोणताही अंकूश ठेवलेला नाही. त्यामुळे सरकारने राज्यातील वातावरण खराब करण्याचा निर्णय घेतला आहे का? दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे का? अशा प्रश्नांच्या फैरीही मेटे यांनी झाडल्या.

अजितदादा, थोरात, शिंदे गप्प का?

ओबीसी नेते, मंत्री आरक्षणावर बोलत असताना सरकारमधील मराठा मंत्री गप्प का बसलेले आहेत? छगन भुजबळ ओबीसी आरक्षणावर बोलतात मग उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणावर का बोलत नाहीत? विजय वडेट्टीवार बोलतात मग महसूल मंत्री बाळासाहेब थोरात का भूमिका घेत नाहीत? माजी आमदार प्रकाश शेंडगे बोलतात मग नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई मौन बाळगून का आहेत? मराठा आमदारही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

अधिवेशनात चर्चा व्हावी

राज्यात दोन दिवसाचं हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. मराठा आमदार आणि मंत्र्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन करतानाच मी सर्व मराठा आमदारांना पत्रं लिहून ही चर्चा घडवून आणण्याची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू: देवेंद्र फडणवीस

ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका, ओबीसी आरक्षण रद्द करण्याची सराटेंची मागणी  

SEBC म्हणजेच ओबीसी, हा प्रवर्ग जुनाच आहे : पी. बी. सावंत 

(vinayak mete slams obc leader over maratha reservation)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.