विजय वडेट्टीवार यांच्या मुलीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातूचं ओपन चॅलेंज, शिवानी आव्हान स्वीकारणार?

"बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे?", अशा खोचक शब्दांत टीका करणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांना खुलं आव्हान देण्यात आलं आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी याबाबतचं चॅलेंज दिलं आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या मुलीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातूचं ओपन चॅलेंज, शिवानी आव्हान स्वीकारणार?
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 9:07 PM

पुणे : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केलीय. “बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं”, असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सात्यकी सावरकर यांनी शिवानी वडेट्टीवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. “शिवानी वडेट्टीवार यांनी केलेला दावा चुकीचा आहे. सावरकरांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी तसं स्टेटमेंट शोधून दाखवावं”, असं चॅलेंज सात्यकी सावरकर यांनी दिलं आहे.

“मी शिवानी वडेट्टीवार यांचा व्हिडीओ बघितला. त्या व्हिडीओत अतिशय चुकीचं विधान करण्यात आलं आहे. सावरकरांनी असं कोणतंही वाक्य सहा सोनेरी पानं या पुस्तकात लिहिलेलं नाही. त्यांनी तसं स्टेटमेंट काढून दाखवावं. असं कोणतंही स्टेटमेंट या पुस्तकात नाही. मी स्वत: पुस्तक वाचलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया सात्यकी सावरकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“हे मुद्दाम टार्गेट केलं जातंय. याला दुसरं तिसरं काही कारण नाही. एकतर यांनी अभ्यास केलेला नाही. पूर्ण वाचलेलं नाही. यांचे सल्लागार मंडळ सांगतात की, सावरकरांनी असं असं लिहिलेलं आहे. पण त्यांनी स्वत: पडताळून पाहिलं नाही. सावरकर हे हिंदुत्ववादी नेते होते. महाराष्ट्रात आणि देशात हे हिंदुत्ववादी सरकार आहे जे सावरकरांच्या विचारांच्या जवळ जाऊ शकतं. ज्यांची हातातून सत्ता गेली आहे, कुणाचं तरी लांगुलचालन करुन सत्ता परत मिळावी या केवळ राजकीय लाभापोटी सावरकरांना लक्ष केलं जातंय”, असं सात्यकी सावरकर म्हणाले.

शिवानी वडेट्टीवार नेमकं काय म्हणाल्या?

“हे लोकं फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. कुठला मोर्चा काढतात? तर सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात? सावरकर मला तर… माझ्यासोबत सगळ्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते, काय विचार होते. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्या सारख्या महिला भगिनींना कसं सेफ वाटेल? आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोकं रॅली काढतात”, अशी टीका शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे.

शिवानी वडेट्टीवार यांच्या दाव्यावर भाजपकडून टीका

दरम्यान, शिवानी वडेट्टीवार यांच्या व्हिडीओवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. “नेतेच जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास समजू शकले नाहीत तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागपुरात गंगा-जमुना वस्तीमध्ये जाऊन देशाच्या संस्कृतीची नाचक्की होईल, अशी वर्तवणूक केली. सावकरांविषयी ते असे प्रश्न उपस्थित करता हे पाहून रागही येतो आणि दयाही येते. मला वाटतं हे काँग्रेसची विनाशकाली विपरीत बुद्धी आहे. ही राजकीय आत्महत्या आहे. आम्हाला जे स्वातंत्र्य हवं होतं ते संस्कारीक स्वातंत्र्य हवं होतं. सोयराचारी स्वातंत्र्य हे काँग्रेस जन्माला घालतंय”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.