मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू: अजित पवार

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल धक्कादायक आहे. (we can meet pm narendra modi on maratha reservation issue, says ajit pawar)

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू: अजित पवार
ajit pawar
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 3:20 PM

पुणे: मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल धक्कादायक आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं सांगतानाच वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. (we can meet pm narendra modi on maratha reservation issue, says ajit pawar)

अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी प्रदीर्घ संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनपासून ते मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी वकिलांची जी फौज ठेवली होती. तीच फौज मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी ठेवण्यात आली होती, असं सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेला निर्णय धक्कादायक आहे. मात्र सरकार आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. किंवा आवश्यकता पडल्यास मध्येच एक दिवसाचं अधिवेशन घेऊन एक ठराव करण्यात येईल. वेळ पडल्यास सर्व पक्षीयांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू, असं पवार यांनी सांगितलं.

केंद्रावर टीका

यावेळी त्यांनी लसीकरणारवरून केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. रशियाने भारताला कोरोनाची लस दिली आहे. मात्र, त्यांच्या नागरिकांचं लसीकरण केल्यावरच त्यांनी भारताला लस पाठवली. आपण आपल्या देशातील नागरिकांचं लसीकरण पूर्ण न होताच इतर देशांना लसी पाठवल्या. हा अत्यंत चुकीचा निर्णय होता, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली. 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांना लस देणं गरजेचं आहे. मात्र, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात अडथळा येत आहे. लस नसल्याने ही अडचण निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

दरात तफावत नको

यावेळी त्यांनी लसीच्या दरांवरूनही केंद्रावर टीका केली. केंद्र सरकारला लस स्वस्तात मिळत आहे. राज्यांना मात्र महागड्या दरात लस मिळत आहे, असं सांगतनाच सीरमचे अदर पूनावाला परदेशात आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या 10 ते 12 दिवसात ते भारतात येतील. ते आल्यावर लस आणि लसींच्या दरांबाबत त्यांच्याशी चर्चा करू, असंही त्यांनी सांगितलं.

पुण्याच्या लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील

यावेळी त्यांनी पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं सांगितलं. मात्र, पुण्यात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश त्यांनी दिले. राज्यात लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही पुण्याचे ना? मग कुणावर विश्वास ठेवता?

यावेळी त्यांनी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आघाडीत घुसमट होत असून ते कधीही सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे, असं काकडे यांनी म्हटल्याचं पवार यांच्या निदर्शनास आणून दिलं. यावेळी तुम्ही पुण्याचे आहात ना? मीही पुण्याचा आहे. त्यामुळे कोण काय बोलतं आणि कुणावर विश्वास ठेवायचा हे समजलं पाहिजे, असं सांगत पवार यांनी काकडेंच्या विधानाची खिल्ली उडवली. (we can meet pm narendra modi on maratha reservation issue, says ajit pawar)

संबंधित बातम्या:

लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा; खासदार उदयनराजे आक्रमक

महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, कोर्टात कोण काय म्हणालं? ते वाचा सविस्तर

मराठा समाजाचं ठरलं, 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार, पहिल्या मोर्चाचं ठिकाणही ठरलं!

(we can meet pm narendra modi on maratha reservation issue, says ajit pawar)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.