AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन नकोच, आम्हाला आमच्या नशीबावर सोडा: राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. (We'll oppose lockdown, says Raju Shetti)

लॉकडाऊन नकोच, आम्हाला आमच्या नशीबावर सोडा: राजू शेट्टी
राजू शेट्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना
| Updated on: Apr 04, 2021 | 11:10 AM
Share

पंढरपूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, ज्यांचे रोजगार बुडणार आहेत त्यांना भरपाई द्यावी. तरच लॉकडाऊन करावा. हे जमत नसेल तर आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. (We’ll oppose lockdown, says Raju Shetti)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचा प्रचार करण्यासाठी राजू शेट्टी आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी लॉकडाऊनला जोरदार विरोध केला. आधी शेतमालाला किंमत द्या, मगच लॉकडाऊन करा. ज्यांचा रोजगार बुडणार आहे त्यांना भरपाई द्या. ज्यांचा व्यवसाय बुडाला त्यांना भरपाई द्या. मग लॉकडाऊन करा. आमचं काही म्हणणं राहणार नाही. नुसताच लॉकडाऊन करतो म्हणणं योग्य नाही. त्यापेक्षा सरकारनं आम्हाला आमच्या नशीबावर सोडावं. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी म्हणाले.

कोरोनाच्या बजेटमध्ये भ्रष्टाचार

लॉकडाउन काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. 4 रुपयांची मास्क 40 रुपये विकला जातो. हे नेमकं काय आहे, हे सरकारनं सांगावं, असं ते म्हणाले. गेल्या वर्षीचे बजेट कोरोनासाठी वापरले त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

महाविकास आघाडीची भूमिका अमान्य

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडला. शेट्टी यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार टीका केली. महाविकास आघाडीतिल प्रमुख तीनही पक्षाची भूमिका पटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

अटीतटीची लढत

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे. तर स्वाभिमानीने सचिन पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भालके यांचं निधनामुळे पोटनिवडणूक

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता. (We’ll oppose lockdown, says Raju Shetti)

संबंधित बातम्या:

आधी जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम, आता अजित पवारांचा नंबर, पुणे मनपा उपमहापौर निवडणुकीत कुणाची बाजी?

पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीत भाजपला धक्का देण्याची तयारी, कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर

सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा

(We’ll oppose lockdown, says Raju Shetti)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.